

Baramati News : शनिवार (ता. 31) दिवसभराच्या नाटयमय घडामोडीनंतर पवार कुटुंबियांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतला असून लवकरच या बाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तिय माजी ज्येष्ठ नगरसेवक विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी आज याबाबत माहिती दिली आहे.
शनिवारी (ता. 31) सकाळपासूनच बैठकांचे सत्र सुरु होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्या नंतर पार्थ पवार हे गोविंदबागेत उपस्थित झाले. शपथविधीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे शरद पवार यांनी नमूद केले होते. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना महत्व प्राप्त झाले होते.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शनिवारी (ता.31) झालेल्या बैठकांबाबत बोलताना किरण गुजर म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनिकरण व्हावे अशी इच्छा अजित पवार यांचीच होती, त्या मुळे कुटुंबियांनी या बाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येत आगामी काळात काम करण्याचा निर्णय दिवसभरातील बैठकांनंतर झाला आहे.
कौटुंबिक दृष्टया पवार कुटुंबिय एकत्रच होते आता राजकीय प्रवासही सर्व जण मिळूनच करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार यांचीच दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे अशी इच्छा होती, त्या नुसार त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनिकर येत्या काही दिवसात होणार आहे. शरद पवार यांना विश्वासात न घेताच निर्णय झाल्याने जे काही समज गैरसमज निर्माण झाले होते ते पार्थ पवार व पवार कुटुंबियांच्या भेटीनंतर दूर झाले आहेत, असे गुजर यांनी आवर्जून नमूद केले.
गोविंदबाग या निवासस्थानी सकाळी पवार कुटुंबियांची एकत्र बैठक झाली, त्यात किरण गुजर हेही उपस्थित होते. त्या नंतर पार्थ पवार आल्यावरही त्याही चर्चेत ते उपस्थि होते. जेष्ठ नेते शरद पवार , खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार, रणजीत पवार यांच्या समवेत स्वतंत्र व पुन्हा सहयोग या अजित पवार यांच्या निवासस्थानी पार्थ पवार यांच्यासोबत स्वतंत्रपणे बैठक झाली. त्या नंतर दोन्ही बाजूंनी सकारात्मक निर्णय झाला ही बाब दिलासादायक असल्याचे ते म्हणाले.
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का, नेमके कधी विलिनिकरण होणार, रोहित पवार राज्यमंत्री होणार का, पार्थ पवारांची राज्यसभेवर निवड होणार का या बाबत आगामी काळात पक्षच योग्य ते निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.