मोठी बातमी : प्रसिद्धीसाठी एकनाथ शिंदेंचा स्टंट ; माओवादी प्रवक्त्याचे पत्र व्हायरल

''एकनाथ शिंदे यांना माओवादी संघटनेने कोणतीही धमकी दिलेली नसून, तो त्यांनीच स्वस्त प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे,'' अशा शब्दात माओवाद्यानी पत्रक (naxalite maoist spokesperson letter) काढून खुलासा केला.
eknath shinde
eknath shindesarkarnama
Published on
Updated on

गडचिरोली : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (shivsena eknath shinde) यांना काही दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. नक्षवाद्यांकडून ही धमकी मिळाली असे सांगण्यात आले होते. शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबियांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, ''शिंदे यांना माओवादी संघटनेने कोणतीही धमकी दिलेली नसून, तो त्यांनीच स्वस्त प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे,'' अशा शब्दात माओवाद्यानी पत्रक (naxalite maoist spokesperson letter) काढून खुलासा केला.

सप्टेंबरमध्ये ही धमकी आल्याची माहिती राज्याच्या गृहविभागाने दिली होती. धमकी दिल्याचे समजताच राज्याच्या गृहविभागाने तपास सुरु केला होता. अद्यापही तो तपास सुरु आहे. त्यानंतर शिंदे यांनी 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलिस ठाण्याला भेट दिली होती. शिंदेंनी तेथील पोलिस जवानांच्या सोबत दिवाळीही साजरी केली होती.

eknath shinde
मुख्यमंत्री ठाकरे मलिकांना म्हणाले,''गुड गोईंग''

''एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे सांगणे म्हणजे दुसरी स्टंटबाजी आहे,'' असं भाकपाच्या (माओवादी) पश्चिम ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याने म्हटलं आहे. त्याने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केलं आहे. दिवाळीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नावाने माओवादी संघटनेचे एक पत्रक जारी झाले होते. त्यात शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावर आता माओवादी संघटनेने हे पत्रक जारी करून हा खुलासा केला.

''स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी मंत्री किंवा नेते असा प्रकार करीत असतात. यातून पंतप्रधानही सुटलेले नाहीत. त्यांनीही एनआयए (NIA) च्या माध्यमातून स्वतःच्या हत्येचा कट रचून लोकप्रियता मिळवली आहे. एकनाथ शिंदे यांनीही तेच केले, असे या पत्रकात म्हटले आहे. भाकप (माओवादी)चा पश्चिम ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याच्या नावाने हे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड प्रकल्पाला जनतेचा होत असलेला विरोध दडपण्यासाठी एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार पोलीस बळाचा वापर करीत आहेत. जनतेला न्याय देण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी हे पत्र अधिकृत की अनधिकृत, हे सांगता येत नसल्याची प्रतिक्रिया दिली. हे पत्र आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील लोहखाणींची लीज आणि खाणींविरोधातील आंदोलन या विषयाला धरून प्रवक्ता श्रीनिवास याने काढलेल्या पत्रकात सत्तापक्षातील मंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड केली आहे. खाणींविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यावरून वडेट्टीवार यांना, तर लोहप्रकल्प उभारण्यावर ठाम असण्यावरून शिंदे यांना त्याने लक्ष्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com