Sharad Pawar Party News : आता पक्षाचं नवीन नाव शरदचंद्र गोविंदराव पवार...?

NCP Party Result Hearing: आमचा पक्ष आणि आमचा चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार अशा आशयाचे पोस्टर व्हायरल होत आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarakranama
Published on
Updated on

NCP and Election Results : राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. याचबरोबर उद्यापर्यंत शरद पवार गटाला पक्षासाठी नाव आणि चिन्ह देण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे आता शरद पवार गटाचं नाव आणि चिन्ह काय असणार आहे याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. (NCP News)

राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवार गटाने गमावल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. शरदचंद्र गोविंदराव पवार असं नवीन नाव शरद पवार गटाचं होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या समर्थनामध्ये हे पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
NCP Party Hearing Result : राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह गेल्यानंतर सुप्रिया सुळेंचा पहिला शब्द...... 'अदृश्य शक्ती'!

आमचा पक्ष आणि आमचा चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. शरद पवार(Sharad Pawar) यांच्या समर्थनामध्ये आता त्यांच्या पक्षातील नेते एकवटले आहेत. शरद पवार हेच आमचे नेते आहेत आणि आमचा पक्ष तेच आहेत, असा विश्वास त्यांच्या पक्षातील नेत्यांनी केला आहे. त्यामुळे तीन नावांपैकी हे एक नाव निश्चित होऊ शकतं अशी चर्चा आहे.

निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार -

'निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे.'

'या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.' अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

Sharad Pawar
NCP Party Hearing Result : 'राष्ट्रवादी'बाबत निवडणूक आयोगाच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्यानंतर त्यांच्या पक्षाकडून सोशल मीडियाचा आता पुरेपूर वापर केला जात आहे. सोशल मीडियावर शरद पवार गटाकडून त्यांच्या समर्थनामध्ये पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तर भावनिक साथ देखील या पोस्टच्या माध्यमातून घातली जात आहे.

अशाप्रकारे अजित पवार गटाच्या बाजूचा निकाल हा अवैध आहे आणि अजूनही राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे अशा आशयाचे पोस्टर व्हायरल करण्यात येत आहेत. ह्या सगळ्यामुळे कोठे ना कुठेतरी जशी भावनिक सात उद्धव ठाकरेंना मिळाली होती तशीच साथ शरद पवारांना देखील मिळेल असा विश्वास त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी दर्शवला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com