
Nashik News : नाशिक शहरात गेले काही दिवस गुन्हेगारीचा आलेख हा सतत चढता आहे. शहरात अनेक ठिकाणी कोयता यांचा उपद्रव वाढत आहे. त्यामुळे खुणाचे सत्र पोलिसांची डोकेदुखी बनली आहे.
शहरातील बजरंग वाडी परिसरात काल रात्री अकराच्या सुमारास खळबळ उडवणारी घटना घडली. यामध्ये सशस्त्र टोलक्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावावर हल्ला केला. चॉपर आणि धारदार शस्त्राने झालेल्या या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर तेथून प्रसार झाले.
परिसरात ही माहिती मिळतात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी जखमी अवस्थेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बनना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीस त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले.
उपनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र हल्लेखोरांचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असावा असा कयास बांधला जातोय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही घटनास्थळी धाव घेतली. चार पथके गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आली आहेत. हल्लेखोर एका सार्वजनिक शौचालयाजवळ दबा धरून बसले होते. दोघेही भाऊ येथून जात असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला.
गेल्या काही दिवसात शहरातील सातपूर, नाशिक रोड, अंबड आणि पंचवटी या भागात गुन्हेगारीच्या वर्चस्वातून हत्या झाल्या आहेत. चॉपर आणि कोयता घेऊन अनेक जण शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड देखील होत आहे. हे प्रकार नित्याचे झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे.
मन्ना जाधव हे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संभाव्य उमेदवार म्हणून कार्यरत होते. त्यांनी परिसरातील विविध भागात मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे ते जवळचे होते. सत्ताधारी महायुतीच्या नेत्याचीच हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न चर्चेत आला आहे.
दरम्यान वारंवार होणाऱ्या खुनाच्या घटनांनी शहर हादरले आहे. विशेषता काल रात्री झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांच्या हत्याने शहरात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. गुन्हेगारांचा मागमुस लागला असून लवकरच ते पोलिसांच्या हाती सापडतील, असा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.