

NCP President: राज्याचे बडे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर मंत्रिमंडळातील त्यांची जागा पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतली. पण अद्याप पक्षामध्ये त्यांनी जबाबदारी स्विकारलेली नाही. पण इथंही अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांनीच स्विकारावी असा आग्रह होत असून ही जबाबदारी अपेक्षेप्रमाणं त्यांच्याकडं जाऊ शकते. यासाठी आता अध्यक्ष निवडीचा दिवसही जवळपास निश्चित झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. साम टिव्हीनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड येत्या १५ दिवसांत होणार आहे. सर्वानुमते उपमुख्यंत्री सुनेत्रा पवार यांचीच निवड राष्ट्रीय अध्यक्षपदी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली असल्याचं साम टीव्हीनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळं आता पुढील १५ दिवस हे राज्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील महत्वाचे असणार आहेत. त्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार आहे.
राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची पदाधिकाऱ्यांचा सुनेत्रा पवार यांच्या नावालाच पाठिंबा असल्यानं आता केवळ सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळं एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली की त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाच्या घडामोडींना देखील वेग येणार आहे. त्यामुळं पुढील १५ दिवसांत महाराष्ट्रात आता आणखी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळू शकतात.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाला शरद पवारांच्या गटाचा फुल्ल सपोर्ट असला तरी अजित पवारांचे सहकारी असलेल्या नेत्यांना मात्र हे विलिनिकरण नको असल्याचा त्यांचा सूर आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या कुठल्याही चर्चा सुरु नव्हत्या आणि त्याचा आम्ही भाग नव्हतो अशा पद्धतीचं विधान सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून ऐकायला मिळाली होती. त्यामुळं एकदा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदी निवडीनंतर जर विलिनिकरणाची खरोखरच पावलं उचलली गेली तर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथही पाहायला मिळू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.