Asim Sarode : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची धामधूम; सरोदेंच्या ट्विटने शहा-फडणवीसांना राजकीय झटका!

Sunetra Pawar Takes Deputy CM Oath; Asim Sarode Slams Shah, Fadnavis : राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधीची तयारी सुरू असतानाच, असीम सरोदे यांनी ट्विटद्वारे भाजपवर निशाणा साधला.
Asim Sarode
Asim SarodeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics breaking : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

याशिवाय उपमुख्यमंत्रीपदावर शपथ देखील घेतली आहे. यातच, विधीतज्ज्ञ असीम सरोदे यांनी भाजपवर हल्ला चढवणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. भाजप नेते गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

असीम सरोदे यांनी, त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, म्हणजे आता भाजपचे महाराष्ट्रात एकूण दोन राजकीय पक्ष? यात अमित शहांची शिंदेसेना आणि आता देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी! नरेश अरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विलीनीकरण रोखतांना पवार कुटुंबाची एकी रोखली की सत्ताकांक्षेचा वापर करून राष्ट्रवादी पक्ष भाजपला आंदण दिला? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

काहीही असो, पण महाराष्ट्राला (Maharashtra) पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार ही आनंदाची बाब आहे. या पुरुषप्रधान राजकारणात जरा चांगुलपणा, पारदर्शकता व संवेदनशीलता आणण्यात सुनेत्राताई यशस्वी ठराव्यात यासाठी असीम सरोदे यांनी शुभेच्छा, देखील दिल्या आहेत.

Asim Sarode
First Budget of India : भारताचं पहिलं बजेट कोणी अन् कधी सादर केलं?

भाजपमधील अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कुठेतरी सुप्त राजकीय संघर्ष, राहिला आहे. यावर अनेकदा चर्चा देखील होत असतात. हा दोघांमधील संघर्ष उफाळून देखील आला आहे. यातच असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, त्यावरच बोट ठेवलं आहे. कुठेतरी डिवचलं आहे.

Asim Sarode
Rohit Pawar News: सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी जोरदार हालचाली; रोहित पवारांचं सूचक ट्विट, काय म्हणाले...?

शहा अन् फडणवीस यांच्यावर निशाणा साधणाऱ्या पोस्टनंतर असीम सरोदे यांनी, आणखी एक नागरिकांना आव्हान करणारी पोस्ट शेअर केली आहे. आपल्याला समजून घ्यावे लागेल की, जे प्रत्यक्ष राजकारणात नाही, त्यांनी सुद्धा राजकारणाबद्दल बोलले पाहिजे. कारण ते नागरिक आहेत. नागरिक असणे हीच एक राजकीय संकल्पना आहे व लोकशाहीतील जबाबदार नागरिकांना कोणत्याच राजकीय पक्षात नसले तरीही राजकारणावर बोलण्याचा हक्क आहे, असेही म्हटले आहे.

तसेच ही पोस्ट भक्तांसाठी नाही कारण ते खऱ्या अर्थाने नागरिक होण्याची प्रक्रिया खुंटली आहे, असे म्हणत, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नाव न घेता डिवचलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com