NCP President Update News : राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार; ऑगस्टपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होणार ?

NCP Political News : लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार
NCP President Update News
NCP President Update News Sarkarnama
Published on
Updated on

Delhi : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्ष संघटनेत कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांची नजर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याचदरम्यान, आता छगन भुजबळांनी ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी अशी मागणी केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा(NCP)ची महत्वाची बैठक दिल्लीत बुधवारी (दि.२८) झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया येत्या दोन तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्षपदाची निवड होणार आहे. ॲागस्टपर्यंत पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

NCP President Update News
Narendra Modi On NCP: राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या भ्रष्ट्राचाराचा आरोप; पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच थेट बोलले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचे सूतोवाच दिले होते. त्यानंतर अलिकडेच पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जयंत पाटील(Jayant Patil) यांनी पाच वर्षांहून अधिक काळ सांभाळली आहे. त्यामुळे आता पक्षाचा प्रदेशाध्यक्षही बदलला जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

अजित पवार(Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात अतिशय सूचक विधान करुन खळबळ उडवून दिली होती. त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्षसंघटनेत कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांची नजर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

NCP President Update News
Priyanka Gandhi In CWC : काँग्रेसची 'टीम २०२४' लवकरच; प्रियांका गांधींना मिळणार मोठी जबाबदारी

एकीकडे ती चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनीही महत्वाचे वक्तव्य केलं होतं. ओबीसी समाजातील नेत्याला प्रदेशाध्यक्ष बनवले जावे अशी भूमिका त्यांनी मांडली. साहजिकच, राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षाचा मुद्दा ऐरणीवर आल्याचे मानले जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com