Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची गुरुवारपासून (ता. ४) विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. त्याबाबत मीडियाशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी मोठे विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय वेळेत घेणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार (Ajit pawar) यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार, खासदारांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. जशी परिस्थिती शिवसेनेत झाली, तीच परिस्थिती राष्ट्रवादीत निर्माण झाली. ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्याविरोधात कोर्टात अपात्रतेची याचिका दाखल केली गेली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विधानसभाध्यक्ष अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतील. निकालाला उशीर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता याप्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठे विधान केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी जुलै महिन्यात काही आमदारांसह शपथ घेतली आणि पक्षात बंडखोरी केली. जितेंद्र आव्हाड यांनी आमदार अपात्र करण्याची याचिका दाखल केली. विधानसभाध्यक्षांनी निकाल लवकरात लवकर द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. विधानसभाध्यक्षांसमोर आता दोन पक्षांच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारीपूर्वी
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी राष्ट्रवादी अपात्र आमदारांची सुनावणी होणार आहे. शिवसेना आमदारांची सुनावणी पूर्ण झाली आहे. 10 जानेवारीपूर्वी शिवसेना आमदार प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या गुरुवारपासून अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. येत्या काळात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
(Edited by Sachin Waghmare)