Banks loss News : राज्यभरातील 29 बँका अडचणीत, 511 कोटींचा तोटा

Pravin Darekar on Bank : प्रवीण दरेकरांनी दिली माहिती
Pravin Darekar
Pravin DarekarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील 29 बँका कर्ज परत न केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या आहेत. या बँकांना बाहेर काढण्यासाठी सरकारने एक समिती गठित केली आहे. यामध्ये चार सदस्यांचा समावेश असून या समितीची बैठक बुधवारी पुण्यात झाली. या बैठकीमध्ये बँकांना कर्जातून बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, यावर चर्चा करण्यात आली. पाचशे कोटींपेक्षा अधिक या 29 बँकांचा तोटा गेल्याची माहिती आमदार प्रवीण दरेकरांनी दिली.

दरेकर म्हणाले, अर्बन सहकारी बँका अडचणीत आल्या आहेत. सरकारने त्यांना आधार दिला नाही, तर अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल. याचा फटका ठेवीदार यांनाही बसू शकतो, याबाबत सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एक समिती नेमली आहे. ही समिती सर्व बाबी जाणून घेऊन सरकारकडे शिफारस करणार आहे. राज्यात अडचणीत आलेल्या 29 बँका आहेत त्यात 511 कोटींचा तोटा झाला आहे. सरकारने या बँकांना मदतीचा हात दिला तर नक्कीच या बँका वर येतील, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pravin Darekar
Chief Justice DY Chandrachud : '23 वर्षांत असं कधीच झालं नाही;' सरन्यायाधीश चंद्रचूड वकिलावर भरकोर्टात भडकले

या बँका तोट्यात गेलेल्या आहेत याचा अर्थ त्यामध्ये कोणी फ्राॅड केलाय असं काही नाही. तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात कर्ज थकल्याने बँकांच्या प्रगतीवर त्याचा परिणाम झाला आहे. या बँकांमधील ठेवींमुळे या बँका अडचणीत आल्या आहेत. यामध्ये संचालक मंडळाने कोणताही घोटाळा केलेला नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. या बँकांमध्ये सांगली, सोलापूर, नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यातील बँकांचा समावेश आहे.

तोट्यात असलेल्या या आहेत त्या 29 बँका

1. श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लिमिटेड, जळगाव

2. द चेंबूर नागरिक बँक लिमिटेड, मुंबई

3. शिक्षक सहकारी बँक लिमिटेड, नागपूर

4. मानवत अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड ,परभणी

5. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर

6. श्रीराम सहकारी बँक, मुंबई

7. द मगवेरा को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, मुंबई

8. द डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई

9. द सर्वोदय बँक को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, मुंबई

10. कोणार्क अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड, ठाणे

11. सांगली सहकारी बँक लिमिटेड, मुंबई

12. द सातारा सहकारी बँक लिमिटेड, मुंबई

13. रत्नचंद शहा को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूर

14. सिटी कॉपरेटिव बँक, मुंबई

15. उद्योम विकास बँक, पुणे

16. सिंधुदुर्ग सावंतवाडी अर्बन कॉपरेटिव बँक, सिंधुदुर्ग

17. रायगड सहकारी बँक, मुंबई

18. द विटा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, सांगली

19. नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक, नाशिक

20. द नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक, नाशिक

21. पाटण को-ऑपरेटिव बँक, ठाणे

22. धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी बँक,धुळे

23. कुणबी सहकारी बँक, मुंबई

24. श्रीजी भटया कॉपरेटिव बँक, मुंबई

25. महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सातारा

26. ओम दत्त चैतन्य सहकारी बँक, सातारा

27. वर्धा जिल्हा आशीर्वाद महिला नागरी सहकारी बँक

28. येवला मर्चंट कॉपरेटिव बँक, नाशिक

29. ब्रह्मपुरी अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड चंद्रपूर

Edited by : Chaitanya Machale

Pravin Darekar
Uddhav Thackeray : रामलल्लाच्या दर्शनाला जाणार का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com