Maharashtra TET Exam: मोठी बातमी! 'नीट'च्या पेपरफुटीचा धसका, 'टीईटी' परीक्षेसाठी नवी नियमावली जाहीर; दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी

NEET Paper Leak Impact : राज्य परीक्षा परिषदेनं आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET)च्या परीक्षार्थींसाठीचे नियम आणखी कठोर केले आहेत. देशात नीट परीक्षेचा पेपरफुटीचं प्रकरणानं मोठी खळबळ उडाली होती.
TET exam
TET examSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: देशात नीट परीक्षेचा पेपरफुटीचं प्रकरणानं मोठी खळबळ उडाली होती. विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या पेपरफुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे विविध राज्यांसह महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. केंद्रासह राज्य सरकारनं खबरदारी म्हणून अनेक कठोर पावले उचलली आहेत. याचदरम्यान,आता टीईटी परीक्षेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्य परीक्षा परिषदेनं आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET)च्या परीक्षार्थींसाठीचे नियम आणखी कठोर केले आहेत. यावेळी परीक्षा परिषदेनं यापुढे टीईटी परीक्षेच्या परीक्षार्थांना बुरखा, मास्क ,टोपी यांपैकी काहीही परिधान करुन परीक्षेला बसता येणार नाही.

टीईटीच्या परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांसह कर्मचार्‍यांचे मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी ‘फ्रिस्किंग’ होणार आहे. तसेच टीईटीच्या सर्व परीक्षार्थींसाठी बायोमेट्रिक हजेरी घेतली बंधनकारक करण्यात आली आहे.

राज्य परीक्षा परिषदेनं आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या(TET)च्या परीक्षार्थांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र यापैकी एकाची मूळप्रत सोबत ठेवणं आता अनिवार्य असणार आहे. जर परीक्षार्थींकडे वरती दिलेल्या मूळप्रत नसल्यास त्याला परीक्षेला बसता येणार नाही.

TET exam
Rajabhau Waje: नाशिकचा ‘राजा’ मैदानात! राजाभाऊ वाजेंचे जंगी स्वागत; आता भगवा अधिक जोमाने डोलणार!

राज्य परीक्षा परिषदेने यावेळी आणखी एक कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यातपरीक्षा केंद्रात डमी विद्यार्थी किंवा इतर कोणीही प्रवेश केल्याचं निदर्शनास आल्यास दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य परीक्षा परिषदेनं म्हटलं आहे.

केंद्रावर परीक्षार्थ्याचे फेस रिकग्नीशन, आधार पडताळणी, परीक्षा केंद्र आणि परिसर, परीक्षा दालनात सीसीटीव्ही हेही असणार आहेत.तसेच संपर्कासाठी प्रत्येक परीक्षा केंद्र संचालक, परीक्षा नियंत्रण कक्ष आणि राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे ‘कनेक्ट व्ह्यू’मध्ये इंटरनेट फोन उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

TET exam
Om Rajenimbalkar : ओम राजेनिंबाळकरांचा ‘यू-टर्न’? एकनाथ शिंदेंकडे जाण्यापूर्वी घेतला मोठा निर्णय

टीईटीच्या परीक्षार्थींना दिलेल्या उत्तरपत्रिकांसोबत दोन कार्बन कॉपीचांही समावेश असणार आहेत. एक परीक्षार्थीं आणि दुसरी परिषदेसाठी राहणार आहे. याचदरम्यान,राज्य परीक्षा परिषदेनं यापुढे दिव्यांग परीक्षार्थींना लेखनिक म्हणून कुटुंबातील सदस्यला सोबत नेण्यास मनाई केली आहे. दिव्यांग परीक्षार्थीस लेखनिक घ्यायचा असेल, तर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com