Nishikant Dubey Controversy : निशिकांत दुबेला मराठी खासदारांनी घेरलं, 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा देताच हात जोडले, संसदेच्या लाॅबीमधून काढला पळ!

Nishikant Dubey Shobha bachhav pratibha dhanorkar : निशिकांत दुबे यांना मराठी खासदार शोधत होते. लोकसभेचे कामकाज संपताच दुबे लोकसभेच्या लाॅबीमध्ये दिसताच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी दुबेंना घेरले.
Varsha Gaikwad, Pratibha Dhanorkar, and Shobha Bachhav confront Nishikant Dubey with loud 'Jai Maharashtra' slogans in Parliament.
Varsha Gaikwad, Pratibha Dhanorkar, and Shobha Bachhav confront Nishikant Dubey with loud 'Jai Maharashtra' slogans in Parliament.sarkarnama
Published on
Updated on

Nishikant Dubey News : 'कुत्ता भी आपनी गली में शेर होता है, महाराष्ट्र के बाहार आयो पटक पटके मारेंगे', असे म्हणत भाजप खासदार निशिकांत दुबे याने मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दुबेला तू फक्त मुंबईत येत तुला समुद्रात डुबे डुबे के मारेंगे, असे प्रतिआव्हान दिले होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा लोकसभेत गाजदार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मराठीच्या मुद्यावर महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार देखील आक्रमक झाले आहेत.

निशिकांत दुबे यांना मराठी खासदार शोधत होते. लोकसभेचे कामकाज स्थगित झाले होते. त्यावेळी दुबे लोकसभेच्या लाॅबीमध्ये दिसताच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी दुबेंना घेरले. मराठी माणसाला पटक पटके मारण्याची भाषा कशी करता. मराठी भाषिक तुमची अरेरावी सहन करणार नाहीत, असे सुनावले. वर्षा गायकवाड यांनी 'जय महाराष्ट्र'ची घोषणा देताच दुबेनी सरळ हात जोडले आणि आप मेरी बहन हो, असे म्हणत तेथून पळच काढला.

महाराष्ट्रात त्रिभाषा सुत्रानुसार पहिलीपासून हिंदी शिकवण्याची सक्ती करणारा जीआर सरकारने काढला होता. तो जीआर रद्द करण्यात आला. मात्र मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे हे आक्रमक होत त्यांनी सरकारला सुनावले होते. त्यानंतर निशिकांत दुबे याने मराठी माणसाला डिवचणारी विधाने करत हिंदी भाषिक जो करत भारतात त्यावर महाराष्ट्र विकास करत असल्याचे अकलेचे तारे तोडले होते.

मुंबईत मराठी भाषिक अल्पसंख्याक असल्याचा दावा देखील दुबे याने केला होता. मुंबईत मराठी भाषिक हे 32 टक्के आहेत.तर, हिंदी भाषिक देखील तेवढेच आहेत. गुजराती भाषिक 12 टक्के आहेत. इतर भाषिकांच्यापेक्षा मराठी भाषिकांची संख्या कमी असल्याचे दुबे याने मुलाखतीमध्ये सांगितले होते. तसेच राज ठाकरेंनी हिंदीतून दुबेला प्रत्युत्तर देत मुंबईतील समुद्रात डुबे डुबे के मारेंगे असे म्हटले होते. त्यावर दुबेने मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? असे ट्विट केले होते.

दुबेला कायमचा धडा मिळणार?

मराठी माणसाला डिवचणारी वक्तव्य निशिकांत दुबे करतो आहे. संसेदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्यावर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार एकवटण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी पहिला धडा दुबेला दिला आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार देखील दुबेला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी माणसाला डिवचणाऱ्या दुबेला कायमचा धडा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com