Pune Political News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद मोहोळला प्रसिद्धी देण्यावरुन नाराजी जाहीर केली तर दुसरीकडे भाजप आमदार आणि त्यांचे सुपूत्र नितेश राणे शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यांनी शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत प्रसारमाध्यमांनी शरद मोहोळ यांच्याविषयी चुकीची माहिती छापू नये, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.
भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोमवारी पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहळच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे यांनी शरद मोहोळने जे हिंदुत्वासाठी काम सुरू केले. ते त्यांच्या पत्नीनं सुरू ठेवावे, हिंदू समाजावर संकट आलं तर हे कुटुंब उभे राहिले आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
दुसरीकडे मात्र, नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद मोहोळला प्रसिद्धी देण्यावरुन नाराजी जाहीर करताना शरद मोहोळ तो कोण देशाचा मोठा नेता होता का ? अशी विचारणा करीत धारेवर धरले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) रविवारी सिंधुदुर्गात आले असताना त्यांनी मीडियाशी बोलताना कुख्यात गुंड असलेल्या शरद मोहोळच्या नेहमीच तुम्ही बातम्या चालवता. तो कोण देशाचा मोठा नेता होता की? कोण विद्वान होता? असा प्रश्न उपस्थित केला.
नको ते प्रश्न विचारू नका
सोलापूरमध्ये नितेश राणे आणि टी. राजा यांच्यावरील दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल या वेळी एका पत्रकाराने नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असे गुन्हे दाखल होतात, त्यात काय? असा प्रश्न उलट पत्रकारांना विचारला. त्यावर तुम्ही वकील देणार का असा प्रश्नही पत्रकारांना विचारला. त्यासोबतच तुम्ही नको ते प्रश्न विचारू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांना दिला.
पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा भागात शुक्रवारी दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad mohol) याला ठार करण्यात आले. चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडाली.
हल्ल्यानंतर मोहोळला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्याला मृत घोषित केले गेले. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि आठ आरोपींना ताब्यातही घेतले.