Congress Political News : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता पुढचा नंबर काँग्रेसचा ? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून चार दिवसानंतर मतमोजणी होणार असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. त्यातच येत्या काळात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकारणात फार मोठं बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काँग्रेसमध्ये फूट पडेल असा मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक काळात काँग्रेसमधील (Congress) अदृश्यशक्तींनी मदत केली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात महायुतीचे उमेदवार मोठया प्रमाणात निवडून येतील, असा दावाही नितेश राणे यांनी केला. राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना दावा केला आहे. (Nitesh Rane News )
आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे सहकुटुंब शिर्डीला आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. येवेळी त्यांनी 4 जूननंतर काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये येणार आहेत. त्यात विजय वडेट्टीवार यांचेही नाव आहे. त्यामुळे लवकरच वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी चांगलंही राहील. त्यामुळे येत्या 4 जूनला निवडणूक निकालात महायुती अत्यंत ताकदीने निवडून येणार आहे. राज्यातील जनतेने मोदींच्या विचारांचे प्रतिनिधी निवडून देण्याचा निर्णय घेतला असल्याने महायुतीला कसलीच चिंता नाही.
छगन भुजबळ यांचे ते वैयक्तिक मत
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जो प्रकार केला तोच जर भाजप नेत्यांकडून घडला असता तर मविआच्या नेत्यांनी धिंगाणा घातला असता. आपल्या हातात काय आहे आणि काय फाडतो याची जाणीव पाहिजे. मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली असून ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाचा आणि नेतृत्वाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे यावेळी राणे यांनी स्पष्ट केले.
4 जूनपर्यंत थांबायला हवे
पीएम मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये सगळ्याबाबत सकारात्मक निर्णय होतील. देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोदी ऐतिहासिक निर्णय घेतील. त्यामुळे आता 4 जूनपर्यंत थांबायला काय हरकत आहे? असे ते कांदा निर्यातीच्या प्रश्नावर बोलताना राणे यांनी स्पष्ट केले.