BJP News : राणेंची 'शांतीत क्रांती'; पण फडणवीसांच्या 'ढाण्या वाघा'ची मंत्रिपदाची संधी यंदाही हुकली

Political News : भाजपमधील 19 मंत्र्यांनी शपथ घेतली असून कणकवली मतदारसंघाचे आमदार आणि खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना देखील संधी मिळाली.
Gopichand Padlakar, Nitesh rane
Gopichand Padlakar, Nitesh rane Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना यंदा मंत्रिपदाचा बहुमान मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना संधी मिळाली. त्यामध्ये, भाजपमधील 19 मंत्र्यांनी शपथ घेतली असून कणकवली मतदारसंघाचे आमदार आणि खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना देखील संधी मिळाली.

नितेश राणे यांची ही आमदारकीची तिसरी टर्म आहे, त्यामुळे त्यांना तिसऱ्या टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली, त्यामुळे राणेंची 'शांतीत क्रांती' झाली अशी चर्चा असताना दुसरीकडे मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ढाण्या वाघा' असलेल्या गोपीचंद पडळकर यांची मंत्रिपदाची संधी यंदाही हुकल्याने काही जणांनी नाराजी व्यक्त केली.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणेंचं बालपण मुंबईतच गेले. मुंबईतील चेंबूर येथील स्वामी विवेकानंद हायस्कुलमध्ये त्यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, पदवीधर शिक्षण पूर्ण होताच ते पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले. एमबीएपर्यंतचे शिक्षण त्यांनी लंडनमध्ये पूर्ण केले. त्यामुळे, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फॉरेन रिटर्न मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होऊ शकतो. घरातून राजकीय बाळकडू मिळाल्याने नितेश राणेंनी परदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतरही राजकीय जीवनातच करिअर केले. त्यांना कुटुंबातून प्रत्येक निर्णयाला खंबीर साथ मिळाली.

Gopichand Padlakar, Nitesh rane
Cabinet expansion news : 'मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे', म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांनाच शिंदेंनी बदलले?

नितेश राणे (Nitesh Rane) हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. या मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून ते आले आहेत. भाजपचे तरुण आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नितेश राणे हिंदुत्त्व मुद्द्यावरून आक्रमपणे भाषण करतात. विविध सामाजिक कार्य, मतदारसंघातील कामे आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्याची त्याची शैलीमुळे पक्ष खूश आहे. त्यामुळेच त्यांना फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी 'शांतीत क्रांती' घडवल्याची चर्चा आहे.

Gopichand Padlakar, Nitesh rane
Maharashtra Cabinet Expansion : भाजप, राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांवर विश्वास, मंत्रि‍पदाची घेणार शपथ!

भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील पडळकरवाडी हे मूळ गाव. हा परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. पण सध्याच्या काळात डॉक्टरांची वाडी म्हणून पडळकरवाडीची ओळख बनली आहे. इथल्या एकूण 100 कुटुंबांमध्ये 40 जण डॉक्टर आहेत, ही या गावाची ओळख आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांचे नाव महाराष्ट्राला परिचित झाले आहे. फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव जानकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी जानकर यांच्यासोबत मिळून आरक्षण आंदोलनाला बळ दिले.

Gopichand Padlakar, Nitesh rane
Maharashtra Cabinet expansion: मंत्रिपद भुजबळ की धनंजय मुंडेंना ? अजितदादांनी शेवटच्या क्षणी फोन करीत सस्पेन्स संपवला

2019 च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांविरुद्ध लढत दिली होती. पण अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पडळकर यांचं काहीच चाललं नाही. तर 2019 एप्रिल-मे दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडळकर सांगलीतून निवडणुकीस उभे होते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवत येथे वातावरण निर्मिती केली. पण याठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी वंचितच्या गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना 3 लाख 234 मते मिळाली होती. याशिवाय 2014 आणि 2009 मध्ये पडळकर सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क वाढवत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली.

Gopichand Padlakar, Nitesh rane
Cabinet Expansion News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा 'मुंडें'चा आवाज; धनंजय-पंकजा पहिल्यांदाच एकत्र मंत्रीमंडळात!

त्यानंतर पडळकर यांनी कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या 'शिवप्रतिष्ठान संस्थाना'चे प्रमुख संभाजी भिडे यांच्याशी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत असलेल्या संबंधाचा फायदा झाला. पडळकर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने त्यांना भाजपमध्ये संधी मिळत गेली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली होती. त्याठिकाणी ते निवडून आले. त्यामुळे त्यांना यावेळेस मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे वाटत होते.

भाजपकडे सध्या धनगर चेहरा नाही. प्रकाश शेंडगे काही काळ होते. पण ते बाजूला झाले. माजी मंत्री राम शिंदे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळेच भविष्यातील आखाडे बांधत धनगर समाजातील पडळकर यांना संधी दिली जाईल, असे वाटत होते. मात्र, शेवटच्या क्षणी नितेश राणेंनी 'शांतीत क्रांती' केली पण फडणवीसांच्या 'ढाण्या वाघा'ची मंत्रिपदाची संधी यंदाही हुकली, अशीच चर्चा या निमिताने रंगली होती.

Gopichand Padlakar, Nitesh rane
Maharashtra Cabinet expansion : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांच्या वाट्याला भोपळाच; तर मुंबई,मराठवाड्यातून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com