
Maharashtra Cabinet Expansion : भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेकडून आत्तापर्यंत 38 जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. आज (रविवारी) सायंकाळी चार वाजता मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा नागपूरमध्ये पार पडणार आहे. तर, सोमवारपासून लगेच हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होईल. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेक मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे. तीनही पक्षांकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 50 टक्के मंत्री हे नवीन असणार आहेत. प्रादेशिक आणि जात समतोल राखत मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून नितेश राणे, मेघना बोर्डीकर, शिवेंद्राराजे भोसले, जयकुमार गोरे, आकाश फुंडकर, आशिष शेलार हे मंत्रिपदाचे नवीन चेहरे असतील.
तर, एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या पंकजा मुंडे, गणेश नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट ,योगश कदम, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक या नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या दत्तात्रेय भरणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. भरणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.