हवा घ्यायलाही पैसे लागतात, वीजबिल कसे माफ करणार? ऊर्जामंत्री नितीन राऊत

Nitin Raut on energy bill : फुकट वीज मिळेल याची कुणीही अपेक्षा ठेवू नये
Nitin Raut on energy bill

Nitin Raut on energy bill

Sarkarnama

Published on
Updated on

जालना : अलिकडील काळात हवा घ्यायला देखील पैसे लागतात आणि पाणी घ्यायला देखील पैसे लागता. अशा वेळी वीजबिल माफीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत कोणतेही वीजबिल माफ होणार नसल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी स्पष्ट केले. ते आज जालन्यात माध्यमांशी बोलत होते. नितीन राऊत यांच्या ताफ्यावर आज वीज बिल फेको आंदोलन पार पडले. बदनापुर भाजपा युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री राऊत यांचा ताफा अडवत त्यावर वीज बिल भिरकावली. यावेळी युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वीज माफीची मागणी केली.

याच आंदोलनानंतर एका पत्रकाराने उर्जामंत्री राऊत यांना वीजबिल माफी मिळणार का? राज्य सरकार वीज बिल माफी देवू शकतो का? वीज काही हवेतून किंवा पाण्यातून बनत नाही. अलिकडील काळात हवा घ्यायला देखील पैसे मोजावे लागतात आणि पाणी घ्यायला देखील पैसे मोजावे लागता. अशा वेळी वीजबिल माफीचा प्रश्नच उद्भवत नाही. वीजनिर्मीतीला कोळसा लागतो. ती वीज ग्राहकांपर्यंत पोहचवायला महामंडळाला मनोरे उभी करायला लागते, स्ट्रीट खांब उभे करावे लागतात. वीज वितरणाला पैसा लागतो. बँकेतून घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर पैसे द्यावे लागतात. महावितरणाने दिलेल्या वीजेचा वापर होतो मग त्याचे पैसे द्यायला नकार का? असाही सवाल राऊत यांनी विचारला.

<div class="paragraphs"><p>Nitin Raut on energy bill</p></div>
हप्त्यावर टिव्ही आणायला गेलेले गडकरी रस्त्यांसाठी नवी आयडिया घेवून आले

राऊत पुढे म्हणाले, कोरोना काळात, लॉकडाऊन काळात २४ तास कोणाची वीज वापरली? आम्हीच तुम्हाला वीज दिली ना? ज्यावेळी महापूर आला त्यावेळी ही आम्ही तुमची वीज सुरु ठेवली. देशात कोळश्याच्या तुटवड्यामुळे अंधार पडायची वेळ आली होती, पण तरीही महाराष्ट्रात लोडशिडींग लावले नाही. मग याच वीज बिलाचे पैसे का नाही? असा सवाल विचारत राऊत यांनी वीज बिल भरण्याची विनंती राज्यातील जनतेला केली.

<div class="paragraphs"><p>Nitin Raut on energy bill</p></div>
न्यायाधिशाला कचऱ्यात उभे केले, तिथे सामान्यांचे काय होत असेल?

मागच्या सरकारचे पाप आमच्या माथी

महावितरण बंद पडणे कुणालाच परवडणार नाही, कारण त्यानंतर आपल्याला खाजगी कंपन्यांची महागडी वीज खरेदी करावी लागेल. त्यामुळे प्रत्येकाने आपले वीज बील भरलेच पाहिजे. मागच्या सरकारने पाच वर्षात वीज कंपन्यांची देणी थकवली तीच आता आमच्या माथी आली आहेत. अशा संकटात देखील महापारेषण आणि महानिर्मीती या दोन्ही कंपन्या आम्ही नफ्यात आणल्या आहेत. शेतकऱ्यांच्या फीडरचा प्रश्न देखील गंभीर आहे. हे फीडर बंद ठेवल्याने फक्त शेतकऱ्यांचेच नाही तर महावितरणचे देखील नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील वीज बील भरून सहकार्य केले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com