Mahayuti Government : बिनपगारी फुल्ल अधिकारी! चार महिन्यांपासून मंत्र्यांच्या खासगी सचिवांना पगारच नाही

Government Officers Salary Issue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मंत्र्यांकडे खासगी सचिव, पीए आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि स्टाफच्या नेमणुकीला मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी आवश्यक केली आहे.
Mantralaya Unpaid Government Staff
Mantralaya Unpaid Government StaffSarkarnama
Published on
Updated on

Government Staff Payment Crisis: बिनपगारी फुल्ल अधिकारी, अशी अवस्था मंत्र्यांच्या खासगी सचिवांची, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची झाली आहे. कारण मागील चार महिन्यांपासून त्यांचा पगारच झालेला नाही. आणि पुढे कधी पगार होणार याची देखील कल्पना त्यांना नाही. त्यामुळे त्यांच्यावर उसणवारी करण्याची वेळ आली आहे. या संदर्भातील वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर स्पष्ट केले होते की मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानीनेच खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती आमदार, मंत्र्यांनी करावी. ज्या खासगी सचिवांची नियुक्ती मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. त्यांच्या चारित्र पडताळणी मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे.

Mantralaya Unpaid Government Staff
Ajit Pawar Politics: अजितदादांची 'छत्रपती' मध्ये खेळी, पडसाद माळेगाव कारखान्यात!

प्रत्येक अधिकाऱ्याची चौकशी होऊन त्याची नियुक्ती होत असल्याने नियुक्तीला उशीर होत आहे आणि बँकेतही पगार जमा होत नसल्याचे सांगितले जात आहे. शेकडो अधिकाऱ्यांचा पगार जमा झाला नसल्याची माहिती आहे.

वादग्रस्त नियुक्त्या रोखण्यासाठी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना काही पीए, खासगी सचिव यांच्या विषयी तक्रारी येत होत्या. अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांना लगाम घालण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मंत्र्यांकडे खासगी सचिव, पीए आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि स्टाफच्या नेमणुकीला मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी आवश्यक केली आहे.

2014 चा फाॅर्म्युला कायम

देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी पीए, खासगी सचिव यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानी आवश्यक केली होती. तोच फाॅर्म्युला त्यांनी यावेळीही कायम ठेवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची अधिकृत नियुक्ती संबंधित मंत्र्यांना करता येणार आहे.

Mantralaya Unpaid Government Staff
Uddhav Thackeray : 'वक्फ'चा पहिला फटका महाविकास आघाडीला; उद्धव ठाकरे सोडणार काँग्रेसची साथ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com