Kunbi Certificate Video : जीआरनंतर फक्त 27 कुणबी दाखले दिले; जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? ओबीसी नेत्याने आकडेवारीच दाखवली

Babanrao Taywade Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर कुणबी दाखल्यानंतर जीआर काढण्यात आला. मात्र, या जीआरचा फायदा मराठा समाजाला होत नसल्याचा दावा आकडेवारी देत ओबीसी नेते बबनराव तायवडे यांनी केला आहे.
Babanrao Taywade manoj jarange patil
Babanrao Taywade manoj jarange patilsarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी हैद्रबाद गॅझेट लागू करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले. या आंदोलनानंतर सरकारने हैद्रबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर जारी केला. आंदोलन मागे घेताना जरांगे पाटील यांनी या जीआरमुळे मराठवाड्यातील सर्व मराठे ओबीसीत जातील त्यांना आरक्षण मिळेल, असा दावा केला होता. मात्र, 40 दिवसांत 147 अर्ज आले असताना फक्त 27 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचे ओबीसी नेते बबनराव तायवडे यांनी म्हटले.

दोन सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या 35 दिवसांत आठ जिल्ह्यात 142 अर्ज करण्यात आले. त्यामध्ये केवळ 27 दाखले दिल्याचा तायवडे म्हणाले. ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांना दाखला देण्याची तरतूद नाही अन्यथा दाखले घेण्यासाठी रांगा आठ जिल्ह्यात दिसून आल्या असत्या, असे देखील त्यांनी सांगितले.

जीआरमुळे ओबीसींना कोणताही धक्का लागत नसल्याचे यातून दिसून येत आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच दाखल मिळत असल्याचे तायवडे यांनी म्हटले.दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी तायवडेंवर टीका करताना त्यांना काही माहीत नाही ते मॅनेज झाले आहेत, अशी टीका केली.

मनोज जरांगे काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, जीआर निघाला आहे. प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्ज करेल त्याला लागेल तसा अर्ज करेल.हा जीआर मराठवाड्यातील मराठ्यांसाठी आहे.

कुठल्या जिल्ह्यात किती दाखले दिले?

छत्रपती संभाजीनगर - 0

जालना - 0

परभणी -0

हिंगोली -3

नांदेड -0

बीड -11

लातूर -9

धाराशीव -4

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com