

Babanrao Taywade News : मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. आमच्या 58 लाख नोंदी सापडल्या असून त्या प्रमाणे जात प्रमाणपत्र देण्याची मागणी ते करत आहेत. मात्र, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी हा दावा चुकीचा असल्याचे सांगत जरांगेवर टीका केली आहे.
तायवडे म्हणाले, मराठ्यांच्या 58 लाख नोंदी असल्याचा मनोज जरांगे यांच्याकडून वारंवार करण्यात येणारा दावा चुकीचा आहे. ज्या 58 लाख नोंदींचा दावा करतात, त्यापैकी 98 टक्के नोंदी या 2023 पूर्वीच्या, म्हणजेच जरांगे यांच्या आंदोलनापूर्वीच्या आहेत. एवढेच नाही, तर या 58 लाख नोंदी असलेल्या बहुतांश व्यक्तींना जात प्रमाणपत्र आणि त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्रही मिळाले आहे.
'जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर मराठवाड्यात केवळ 49 हजार 358 कुणबी नोंदी सापडल्याचा आहेत.', असा दावा देखल तायवाडे यांनी केला आहे.
'जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यात 3 लाख 11 हजार 287 जणांना जात प्रमाणपत्र देण्यात आले. मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याने ही संख्या वाढली.
धक्कादायक बाब म्हणजे, जात प्रमाणपत्र मिळालेल्या 3 लाख 11 हजार 287 जणांपैकी केवळ 20 हजार 143 जणांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला. त्यापैकी फक्त 15 हजार 597 जणांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.
जरांगे यांच्या आंदोलनाचा फायदा मराठवाड्यातील या 15 हजार 597 जणांना झाला आहे. त्यामुळे जरांगे यांनी 58 लाख नोंदींचा दावा वारंवार करून मराठा समाजासह ओबीसी समाजाची दिशाभूल करू नये, असा टोला देखील तायवडे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.