Video Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी केली देवेंद्र फडणवीसांची कोंडी, म्हणाले, 'जातनिहाय जनगणनेला परवानगी...'

Chhagan Bhujbal devendra fadnavis supports caste census :छगन भुजबळ म्हणाले, आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे. मराठा आरक्षण स्वतंत्रपणे देण्यात यावे. ओबीसी समाज गरीब आहे.
Chhagan Bhujbal  devendra fadnavis
Chhagan Bhujbal devendra fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : वडीगोद्रीत सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. मंत्री छगन भुजबळ या शिष्टमंडळात होते. त्यांनी ओबीसीचे आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र राहण्याचे आवाहन केले तसेच जातनिहाय जनगणनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केले.

छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांचे जातनिहाय जनगणनेला पाठींबा असल्याचे जाहीर केल्याने फडणवीस यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. जातनिहाय जनगणनेसाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व सकारात्मक नाही. शिवाय आरएसएसमधून देखील जाननिहाय जनगणनेला विरोध आहे.

छगन भुजबळ Chhagan Bhujbal म्हणाले, आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे. मराठा आरक्षण स्वतंत्रपणे देण्यात यावे. ओबीसी समाज गरीब आहे. त्याचे हक्काचे आरक्षण घेवू नये. आम्ही आमच्या ताटतले खातो. त्यांना स्वतंत्र ताट देण्यात यावे.

शरीफ हैं हम किसीसे लढते नहीं हैं, जमाना जानता हैं हम किसीके बाप से भी नहीं डरते हैं, असे म्हणत भुजबळांनी आपल्याला खूप धमक्या येत होत्या पण आपण कुणालाही धमक्या दिल्या नाहीत, असे म्हणत जरांगे पाटील यांनी डिवचले.

पंकजा मुंडेंची जातनिहाय जनगणनेची मागणी

भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी देखील प्रत्येक समाजाची जातनिहाय जनजणना करण्याची मागणी केली आहे. आमची अनेक वर्षापासूनची ही मागणी असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. तसेच लक्ष्मण हाके हे योग्य पद्धतीने आंदोलन करत असून त्यांनी कोणाला ललकारले नाही, असं म्हणत नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना डिवचले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com