OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का, 50 टक्क्यांमध्ये कपात? ग्रामपंचायत निवडणुकीच्याआधी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Gram Panchayat Elections OBC Reservation : ओबीसी आरक्षणात कपात करण्याच्या तयारीत राज्य सरकार असल्याची चर्चा आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
The Maharashtra government is considering changes to OBC reservation norms ahead of the upcoming Gram Panchayat elections.
The Maharashtra government is considering changes to OBC reservation norms ahead of the upcoming Gram Panchayat elections.sarkarnama
Published on
Updated on

Gram Panchayat Elections : राज्यातील ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असल्याची चर्चा आहे. जून महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या निवडूका पार पडणार आहेत. 14,237 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्याआधी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या आतमध्ये घेऊन आणण्यासाठी सरकार ओबीसी आरक्षणामध्ये कपात करणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्याआत असावी असे निर्देश कोर्टाने दिले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्यावेळी 50 टक्कांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या 20 जिल्हा परिषदेंच्या निवडणुका थांबवण्यात आल्या होत्या. आता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपचंयात निवडणुकीच्या वेळी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाकडून आधीच खबरदारी घेत 50 टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षणाची मर्यादा ठेवण्याच्या सूचना केली आहे.

अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणात कपात केली जाणार असल्याचे वृत्त 'साम टिव्ही" सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. कायदेशीर अडचण टाळ्यासाठी हे केले जात असल्याची माहिती आहे.

The Maharashtra government is considering changes to OBC reservation norms ahead of the upcoming Gram Panchayat elections.
Maharashtra Gram Panchayat Elections 2026 : 50% आरक्षणाचा फॉर्म्युला लागू; राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार, 12 जूनला आरक्षण सोडत

27 टक्के आरक्षण द्या

ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी या विषयी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या सर्वांवर राज्यसरकार आणि केंद्रसरकारला वाटतं असेल की ओबीसीला न्याय द्यायचा आहे तर संविधानाचे कलम २४३ ड 6 मध्ये सुधारणा करावी. आणि स्थानिक स्वराज संस्थामध्ये सर्वत्र 27 टक्के आरक्षण द्यावे. आमची लोकसंख्या 60 टक्के आहे. मात्र, कमीत कमी 27 टक्के आरक्षण द्यावे ही मागणी करतो आहोत.

The Maharashtra government is considering changes to OBC reservation norms ahead of the upcoming Gram Panchayat elections.
OBC Reservation: ओबीसीतील 'त्या' २७ जाती अद्यापही आरक्षणापासून वंचित! टायपिंग मिस्टेक अन्....; फडणवीसांची स्ट्रॅटेजी सोडवणार प्रश्न?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com