Congress News : दुष्काळाच्या मुद्यावर काँग्रेस सरकारला घेरणार; अशी सुरू केली तयारी...

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळाची महायुती राज्य सरकारला चिंता नसल्याचा आरोप करत काँग्रेसने विभागनिहाय समिती गठीत करत दौरे आखले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे.
Maharashtra Drought
Maharashtra DroughtSarkarnama

Maharashtra News : राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. पाणी टंचाईबरोबर चारा टंचाई निर्माण झाली आहे. तसेच रोजगार देखील मिळत नाही. राज्यातील दुष्काळाची महायुती राज्य सरकारला चिंता नसल्याचा आरोप करत काँग्रेसने विभागनिहाय समिती गठीत करत दौरे आखले आहेत. काँग्रेस दुष्काळाच्या मुद्यावर राज्य सरकारविरोधात आक्रमक होणार असे दिसते.

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार काँग्रेस (Congress) विभागनिहाय दौऱ्यातून दुष्काळाबाबत वस्तूनिष्ठ अहवाल तयार करत आहे. हा अहवाल विभागीय आयुक्तांबरोबर प्रदेश काँग्रेसकडे देखील दिला जाणार आहे. दुष्काळचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी जबाबदारी आखून घेतली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मराठवाडा विभाग समितीचे प्रमुख असणार आहेत. आमदार बाळासाहेब थोरात उत्तर महाराष्ट्र समितीचे प्रमुख असतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नागपूर विभाग समितीचे प्रमुख असतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maharashtra Drought
Sangli News: सांगली बँक गैरव्यवहार प्रकरणात 'स्वाभिमानी'ची उडी; राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना पश्चिम महाराष्ट्र समितीचे प्रमुख करण्यात आले आहे. प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांना कोकण महाराष्ट्र समितीचे प्रमुख आहेत. माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) या अमरावती समितीच्या प्रमुख आहेत.

या समितीत काँग्रेसमधील प्रमुख नेते, आमदार, माजी मंत्री आणि पदाधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितींच्या अहवालानंतर काँग्रेस दुष्काळ आणि त्यासंदर्भात केलेल्या उपाययोजनावरून राज्य सरकारला घेरणार असे सांगितले जात आहे.

आचारसंहिता शिथील करा

दरम्यान तीव्र उन्हाळा आणि दुष्काळाच्या झळांनी महाराष्ट्र होरपळून निघत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथील करा, असे पत्र राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे. यावर आयोगाकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.

किमान दु्ष्काळी कामे आचार संहितेच्या कचाट्यात अडकवू नका, असे राज्य सरकारने म्हटले आहे.यावर महाराष्ट्रातील कोणतीही कामे अडवून ठेवलेली नाहीत, ठेवली जाणार नाही, असे महाराष्ट्राचे सहमुख्य निवडणूक आयुक्त किरण कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

Maharashtra Drought
Lok Sabha Election News : महाराष्ट्रात महायुती 35 ते 40 जागांवर जिंकणार; तर महाविकास आघाडी...; कोणी केले 'हे' मोठं भाकीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com