Lok Sabha Election News : महाराष्ट्रात महायुती 35 ते 40 जागांवर जिंकणार; तर महाविकास आघाडी...; कोणी केले 'हे' मोठं भाकीत

Lok Sabha Election : राजकीय विश्लेषक वेगवेगळा अंदाज व्यक्त करीत असताना राज्यातील निवडणुकांबाबत एका प्रसिद्ध ज्योतिषींनी मोठे भाकीत वर्तवले आहे.
Lok Sabha Election News
Lok Sabha Election NewsSarkarnama

Mumbai News : लोकसभेच्या सहा टप्प्यातील मतदान पार पडले. जवळपास गेल्या तीन महिन्यापासून देशभरात सुरु असलेला निवडणुकीचा धुराळा खाली बसला असतानाच आता सर्वांना 4 जूनच्या निकालाची उत्सुकता आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. त्यामुळे आता सत्ताधारी व विरोधक वेगवेगळे दावे करत आहेत.

एकीकडे भाजप (BJP) 400 जागा जिंकण्याचा दावा करत आहे. तर काँग्रेसही बहुमत मिळेल, असे सांगत आहे. दरम्यान, राजकीय विश्लेषक वेगवेगळा अंदाज व्यक्त करीत असताना महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकांबाबत एका प्रसिद्ध ज्योतिषींनी मोठे भाकीत वर्तवले आहे. त्यामुळे राज्यात कोणाला किती जागा मिळणार याचा अंदाज त्यांनी भविष्यवाणीतून वर्तवला आहे. (Lok Sabha Election News)

Lok Sabha Election News
Ajit Pawar News: नितीन पाटलांना दिलेला शब्द अजितदादा पूर्ण करणार; राज्यसभेची जागा साताऱ्यालाच...

महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना (Shivsena) युती असताना 42 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष मिळवून सहा जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीला किती जागा मिळतील, याची भविष्यवाणी निकालाआधीच प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी वर्तवली आहे.

ठाकरे गटाला सहानुभूतीचा मोठा फायदा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे (Uddhav tahckeray) यांच्या शिवसेनेला गटाला सहानुभूतीचा मोठा फायदा होणार असल्याचा दावा थत्ते यांनी केला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट हा अजित पवार गटापेक्षा सरस ठरणार आहे. अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांना एकाही जागेवर यश मिळणार नसल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात महायुतीचेच सर्वाधिक उमेदवार जिंकणार आहेत. महायुती महाराष्ट्रात जवळपास 35 ते 40 जागा जिंकणार तर उर्वरित जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार, असा दावा थत्ते यांनी वर्तवला आहे. त्यासोबतच त्यांनी बारामती, ठाणे, कल्याण लोकसभेच्या जागांवर कोण जिंकणार? याबाबत सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 400 पारची घोषणा केली होती. मात्र या निवडणुकीत 350 जागा जरी मिळाल्या तरी यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते राज्यात महायुतीला 35 ते 40 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला (MVA) 8 ते 13 जागा मिळतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

Lok Sabha Election News
Nanded Lok Sabha Constituency : नांदेडमध्ये वडील, मुलगा अन् जावई; 30-35 वर्ष एकाच कुटुंबाची सत्ता..

सत्ताधाऱ्यांना बहुमत मिळाले तर ते संविधान बदलतील, हा मुद्दा महाआघाडीने प्रचारात घेतला होता तो खूप महत्त्वाचा ठरला. त्यामुळे मुस्लिम वर्ग आणि दलित वर्ग दुखावला गेला आहे. तर महायुतीने केवळ पीएम मोदींचा चेहरा हा एकच मुद्दा मांडला. महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात इतर राज्यांमध्ये दिसतो तेवढा कडवटपणा नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम हा मुद्दा महाराष्ट्रात फार चालेल, असे वाटत नसल्याचे थत्ते यांनी स्पष्ट केले.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या जागा वाढत असून त्यांना फायदा होताना दिसत आहे. महाविकास आघाडी दोन अंकी आकडा नक्की गाठेल, असेही त्यानी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत आल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला आहे.

Lok Sabha Election News
Jalna Loksabh Constituency : मतदारांचा उत्साह कोणाच्या पथ्यावर? दानवे की काळे?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com