Pratap Sarnaik: महायुतीत अजब 'कारभार': मंत्र्याला न विचारताच अधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय; सामान्यांना फटका

Controversial decision in ST department: शुक्रवारी मध्यरात्रीपासून 14.95 टक्के एसटी वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी सरकारचा निषेध करण्यात आला आहे.
ST Bus
ST Bus Sarkarnama
Published on
Updated on

लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेत आलेल्या महायुतीनं सरकारनं आता लाडक्या बहिणींसह सामान्य प्रवाशांना जोरदार झटका दिला आहे. आधीच महागाईनं बेजार झालेल्या नागरिकांनी एसटी बस भाडेवाढ झाल्यानं संताप व्यक्त केला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी . या भाडेवाढीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

"एसटी भाडेवाढीची मला कल्पनाच नव्हती," असं सांगत सरनाईक यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. प्रताप सरनाईकांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून 14.95 टक्के एसटी वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी सरकारचा निषेध करण्यात आला आहे. धाराशीवचे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते.

ST Bus
Republic Day 2025: पहिला प्रजासत्ताक दिन कुठे साजरा झाला? आता त्या ठिकाणी काय आहे?

"एसटी भाडेवाढ एकत्रितपणे केली ती प्रशासनातील काही लोकांच्या चुकीमुळे झाली आहे. मलाही भाडेवाढीची कल्पना नव्हती. हा निर्णय प्राधिकरण घेते. मलाही दुसर्‍या दिवशी कळाले. मला ही याचे आश्चर्य वाटले," असे सरनाईक यांनी म्हटलं आहे. सरनाईक यांच्या या विधानामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना न विचारताच भाडेवाडीचा निर्णय घेतल्याचे दिसते.

प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, 'वाढलेली महागाई, वाढते इंधन दर यामुळे एसटीवर जवळपास ३ कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. अशावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटीच्या तिकटामध्ये वाढ करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी विशिष्ट दरवाढ करणे अपेक्षित असते मात्र मागील काही वर्षांपासून दरवाढ करण्यात आलेली नाही, असे दोन दिवसापूर्वी सरनाईकांनी सांगितले होते.

ST Bus
Supriya Sule: शिवसेना अन् राष्ट्रवादी का फुटली? सुप्रियाताईंनी सांगितली इनसाईड स्टोरी

आज धाराशीवमध्ये सरनाईक म्हणाले, "'मी अधिकाऱ्यांनाही विचारलं एवढी मोठी दरवाढ होते आपल्याला काहीच माहिती नाही. एखादी संस्था चालवायची म्हटल्यावर असे निर्णय घ्यावेच लागतात. यापुढे दरवर्षी ठराविक पद्धतीने कमी वाढ केली जाईल,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com