Republic Day 2025: पहिला प्रजासत्ताक दिन कुठे साजरा झाला? आता त्या ठिकाणी काय आहे?

History of Republic Day in India: डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सध्याच्या संसद भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती, नंतर इर्विन स्टेडियममध्ये २१ तोफांच्या सलामीसह तिरंगा फडकावला. त्यांनी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले.
First Republic Day 26 Jan 1950
First Republic Day 26 Jan 1950 Picture Credit- Photodivision
Published on
Updated on

Delhi Republic Day 2025 Live : देशाचा 76 वा वर्धापनदिन आज उत्साहात साजरा होत आहे. 26 जानेवारीला 1950 रोजी संविधान का लागू करण्यात आले. त्या दिवसापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. राजधानी दिल्ली दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

देशात 26 जानेवारीला 1950 पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संविधान लागू झाल्यानंतर राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले होते. सध्या राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर हा दिवस साजरा करण्यात येतो. पण पहिला प्रजाकसत्तादिन हा इर्विन स्टेडियम येथे साजरा करण्यात आला होता. सध्या येथे प्राणीसंग्रहालय असून हे मैदान आज मेजर ध्यानचंद स्टेडियम म्हणून ओळखले जाते.

First Republic Day 26 Jan 1950
Congress : काय सांगता? बसपाचं नव्हे तर काँग्रेसचं 'निळं वादळ', प्रचारात होतेय नव्या ड्रेस कोडची चर्चा, नेत्यांच्या मुखी 'जय भीम'

पहिल्या प्रजाकसत्ताक दिनाचे फोटोवरुन हा दिवस कसा साजरा करण्यात आले हे लक्षात येते. या सोहळ्यास काही घोडे, बग्गी यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली असल्याचे दिसते. साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला या कार्यक्रमात मोठा उत्साह होता.

भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर लवकरच, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सध्याच्या संसद भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती, नंतर इर्विन स्टेडियममध्ये २१ तोफांच्या सलामीसह तिरंगा फडकावला. त्यांनी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले.

1955 पासून प्रजाकसत्ताक दिनाचे कर्तव्य पथ येथे हा आयोजन केले जाते. यानिमित्ताने राजधानी दिल्लीत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. या दिवशी, कर्तव्य पथावर (पूर्वीचे राजपथ) एक परेड आयोजित केली जाते. विविध राज्यांतील चित्ररथाचे संचलन येथून होते. हा कार्यक्रम पाहण्यात खूप गर्दी असते. बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची पद्धतही खूप बदलली आहे.

आज साजरा होत असलेल्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे समारंभात प्रमुख पाहुणे आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये इंडोनेशियाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रबोवो यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंधांचा दीर्घ इतिहास आहे जो अलिकडच्या वर्षांत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत विकसित झाला आहे.

First Republic Day 26 Jan 1950
Delhi Assembly 2025: केजरीवालांना हरवण्यासाठी काँग्रेस-भाजपनं बांधला चंग; दिग्गज नेत्यांमधील लढती रंगणार

भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठीच्या त्याच्या दृष्टीमध्ये इंडोनेशियाचीही महत्त्वाची भूमिका आहे.आर्थिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक क्षेत्रातील सहकार्यावर लक्ष केंद्रित करून दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी या राज्य भेटीमुळे मदत होण्याची अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com