Onion Issue : लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आले. महाविकास आघाडीचे 30 तर महायुतीचे 17 उमेदवार विजयी झाले. नाशिक, अहमदनगर, शिरूर या कांद्या उत्पादक क्षेत्रात महायुतीचा पराभव झाला. विधानसभेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फटका बसू नये म्हणून महायुती सरकार 'अॅक्शन मोड'वर आले आहे.
कांद्याच्या प्रश्नावर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक आज (गुरुवारी) होणार आहे.
कृषी पणन उद्योग आयोगाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कांदा प्रक्रिया आणि साठवणुकीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. कांद्या निर्यात बंदीचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचे सांगितले जात होते. निर्यात बंदी मागे घेण्यास उशीर झाल्याने पराभव झाल्याचे विश्लेषण महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आले होते.
लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने महायुतीने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात महायुतीला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यास सुरुवात केली आहे. दूध प्रश्न शेतकऱ्यांचे आंदोलन होत असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकींचा सपाटा लावत हा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या Eknath Shinde उपस्थितीमध्ये बैठक होत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी कांद्याच्या प्रश्नामुळे फटका बसल्याची कबूली दिली होती. पवार म्हणाले होते की, कांदा उत्पादक आणि ग्राहक यांना परवडेल असा तोडगा काढायला हवा, असे आम्ही केंद्राला कळवले होते. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्याने नाशिक, पुणे, अहमदनगर आणि सोलापूरमध्ये फटका बसला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.