Operation Tiger : 'ऑपरेशन टायगर'ला ठाकरेंचा वाघ नडला, शिंदेंच्या शिवसेनेकडून नंतर सावरासावर! काय आहे प्रकरण?

Eknath Shinde Shivsena UBT : ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाल्यानंतर पुढे येत ठाकरेंच्या खासदारांनी या चर्चेमधील हवा काढली. ठाकरेंचे खासदार नडले म्हणून ऑपरेशन टायगर थंडावले,अशी चर्चा आहे.
Operation Tiger
Operation TigerSarkarnama
Published on
Updated on

Rajabhau Waje News: राज्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा आहे. ही चर्चा काल्पनिक की राजकीय डावपेचाचा भाग असल्याची चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांना दबावत आणण्यासाठी हे प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

'ऑपरेशन टायगर' एक वर्षापासून चर्चेत आहे. मात्र शिवसेनेच्या काही खासदारांची ठाम भूमिका शिंदेंचे मनसुबे उधळण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ऑपरेशन टायगरवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनाच खुलासा करावा लागला.

ऑपरेशन टायगर प्रश्नावर प्रारंभी खासदार अरविंद सावंत आणि त्यानंतर खासदार वाजे यांनी उघडपणे आव्हान दिले. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांचा फायदा घेणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना पुढे येत असे ऑपरेशन टायगर सुरू नसल्याचे सांगावे लागले. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा करत ऑपरेशन टायगर आणि बैठका या केवळ अफवा असल्याचे सांगितले.

ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतरखासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली ठाम भूमिका मांडत म्हटले होते की, जोपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आहे तोपर्यंत आपण त्या पक्षाचे कार्यकर्ते असू. अन्य पक्षात जाण्याचा विषयाच नाही. मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार आहे. उद्याही त्याच पक्षाचा खासदार राहील. माझी भूमिका बदलण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळेच माझ्याशी कोणीही संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे खासदार वाजे यांनी सांगितले.

Operation Tiger
Operation Tiger Politics: ‘ऑपरेशन टायगर’वर गिरीश महाजनांचा मोठा इशारा; 'संधी कोण सोडणार', म्हणत राजकारण तापवलं!

ठाकरेंच्या शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, 'ऑपरेशन टायगर' या विषयी स्पष्ट सांगितले की, राज्यात महायुतीची सत्ता आहे. तरीही सातत्याने ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांबाबत बातम्या पेरल्या जातात.

विरोधकांना दबावाखाली ठेवण्याचे हे भाजपचे राजकीय डाव आहेत. ऑपरेशन टायगर या माध्यमातून खासदारांना अमिष दाखविण्याची प्रकार झाले. पक्षांतर बंदी नियमानुसार आवश्यक संख्या जुळविणे हे त्यांना शक्य झालेले नाही.

Operation Tiger
'फोडाफोडीच्या राजकारणाला उत आला' वडेट्टीवारांनी दिली प्रतिक्रिया Wadettiwar on Opretion Tiger,Nagpur

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com