
Sanjay Raut News : पहलगाम हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. पाकिस्तान विरोधात भारत सरकार कारवाईच्या तयारी आहे. पंतप्रधान मोदींनी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देत कारवाईचे अधिकार दिले आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले, 'आमची मागणी आहे विशेष अधिवेशन बोलवा, दोन दिवस कश्मीरवर चर्चा करा, या हल्ल्याची जबाबदारी गृहमंत्रालयावर आहे. त्यांच्यावर कारवाई करा. 27 बळी घेतलेत ते सरकारने घेतलेले नरबळी आहेत.हा मानवी संहार सरकारच्या गाफीलपणामुळे झाला आहे.'
'पुलवामा हल्ल्यानंतरच पाकिस्तानवर हल्ला करायला हवा होता. पुलवामामध्ये 40 सैनिक मारले गेले. राज्यपाल सत्यपाल मलिक म्हटले होते की, आम्ही सांगितले की त्यांना रस्त्याने घेऊन जाऊ नका. सरकारला त्यांना मारायचं होतं? राजकारणासाठी हे जर कोणी म्हटलं तर त्याला देशद्रोही ठरवलं जाईल. त्याला पाकिस्तानात जायाला सांगतील.', असे देखील राऊत म्हणाले.
'पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का नाही झाला? उरीनंतर का नाही हल्ला झाला? हल्ला जो इंदिरा गांधींनी केला, लाल बहादुर शास्त्रींनी केला. त्याला आम्ही हल्ला म्हणतो. बैठका कसला घेताय पाकिस्तानवर हल्ला करा', असे देखील राऊत म्हणाले.
प्रधानमंत्री सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणे जबाबदारी होती. त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हवी होती. मात्र त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द न करता ते बिहारच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला गेले. पूर्वनियोजित कार्यक्रम राहुल गांधींनी रद्द केला. ते अमेरिकेहून परत आले. कश्मिरला गेले सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले. मौन ठेवले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.