Chhatrapati Sambhajinagar : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचार थांबवावा लागला आहे. प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरलेले असतानाच पैठण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना दुखापत झाली आहे. घरी भोवळ येऊन पडल्याने त्यांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना शनिवारी पहाटे पाचोड येथील राहत्या घरी भोवळ आली. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यांना चार ठिकाणी फॅक्चर झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विलास भुमरे यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. विलास भुमरे हे खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार विलास भुमरे यांच्या डाव्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर आहे. या दुखापतीमुळे त्यांना आता प्रचारात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. प्रचार शेवटच्या टप्प्यात असतानाच ही घटना घडली आहे.
दरम्यान, पैठण मतदारसंघातून गेल्या पंधरा दिवसापासून दोघेही पिता-पुत्र रात्रंदिवस प्रचार करत आहेत. संदिपान भुमरे हे खासदार झालल्यानंतर पैठणमधून विलास भुमरे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे. ते यापूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि बांधकाम सभापतीही होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दत्ता गोर्डे यांचे त्यांच्यासमोर पैठण मतदारसंघात आव्हान आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विलास भुमरे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली आहे. पैठण या भुमरेंचा बालेकिल्ला मानला जातो. पण शिवसेना पक्षफुटीनंतर ही विधानसभेची पहिलीच निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी बाजी मारली असली तरी विधानसभेत पुन्हा ते करिष्मा दाखवणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.