MNS Amit Thackeray Viral Letter : माहिम विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील लक्षवेधी मतदारसंघापैकी एक आहे. कारण या मतदारसंघातून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अमित ठाकरेंना विजयी करण्यासाठी मनसेकडून (MNS) पूर्ण ताकदीने इथे प्रचार केला जात आहे. अमित ठाकरे देखील घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. याच प्रचारा दरम्यान त्यांना एका चिमुकलीने दिलेल्या पत्राची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
या चिमुकलीने 'काका तुम्हाला आमदार व्हायचं आहे', असा बालहट्ट पत्रातून केला आहे. शिवाय, 'आमच्या भविष्यासाठी तुम्हाला आमदार व्हावे लागेल. पुढच्या वेळी घरी येताना आमदार अमित ठाकरे म्हणूनच या', असं या पत्रात लिहिलं आहे. उर्वशी नावाच्या मुलीने हे पत्र लिहिलं आहे.
प्रचारादरम्यान अमित ठाकरे एका घरात गेले होती त्यावेळी घरातील उर्वशी नावाच्या छोट्या मुलीने त्यांना पत्र दिलं. या पत्रात लिहिलं आहे, 'अमितकाका तुम्हाला आमदार बनायचं आहे. आज आमच्या घरी तुम्ही अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणून आला आहात.
पण पुढच्या वेळी आमदार अमित ठाकरे म्हणून या. आमच्या भविष्यासाठी काका तुम्हाला आमदार व्हावंच लागेल. हा माझा हट्ट आहे आणि तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. विजयी भव!, तुमचीच उर्वशी लक्ष्मण पाटील.'
माहिम मतदारसंघ (Mahim Assembly Constituency) हा सुरूवातीपासून चर्चेचा ठरलेला आहे. कारण अमित ठाकरेंना या मतदारसंघात महायुती पाठिंबा देणार का आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर माघार घेणार का? यावरून बरंच महाभारत इथे घडलं होतं. मात्र, सरवणकर यांनी माघार न घेतल्यामुळे इथे तिरंगी लढत होत आहे. अमित ठाकरे यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.