Clash In Ajit Pawar NCP : धाराशिव राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात राडा ! संजय बनसोडे यांच्यासमोर मोठा पेच

Dharashiv NCP And Sanjay Bansode : जाहीर केलेल्या पदांची नियुक्तीपत्रे मिळालीच नाहीत
Dharashiv, Sanjay Bansode, Ajit Pawar
Dharashiv, Sanjay Bansode, Ajit PawarSarkarnama

Dharashiv Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून धाराशिव जिल्ह्यात संघटन वाढीबाबतची जबाबदारी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यावर सोपविली आहे. त्यांनी आक्रमकपणे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही सुरु केल्या आहेत. मात्र नुकतेच ते धाराशिव दौऱ्यावर असताना संघटनेच्या विविध पदावर नवनियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी संध्याकाळी जाहीर केलेल्या पदावरील नियुक्तपत्र न वाटप झाल्याने दोन गटात राडा झाला. यामुळे निर्माण झालेला वाद सोडवण्याचा बनसोडेंसमोर पेच निर्माण झाला आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार आक्रमकपणे आपल्या गटाची ताकद वाढवताना दिसत आहेत. यात त्यांनी जातीने लक्ष घालून शरद पवारांच्या सभांनाही उत्तर देण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकीच्या धर्तीवर पक्षाच्या वतीने मंत्र्यांवर पक्ष संघटना मजबुतीकरणाची जबाबदारी सोपवली आहे. यासाठी एका मंत्र्याकडे काही जिल्हे देण्यात आले आहेत. क्रीडामंत्री बनसोडे यांच्याकडे लातूर, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्याची जबाबदारी आहे.

Dharashiv, Sanjay Bansode, Ajit Pawar
Radhakrishna Vikhe Patil : कर्जत-जामखेडमधील 'त्या' टँकर्सवरून विखे पाटलांचा पाराच चढला; तहसीलदारांना सुनावले !

दरम्यान, धाराशीवर दौऱ्यावर असलेल्या क्रीडामंत्री बनसोडे यांच्यासमोरच नियुक्तीपत्रांवरून पक्षाचे दोन गट भिडले. यावेळी आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष महेंद्र दुरगुडे, सुरेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. नियुक्तपत्र वाटप झाल्यानंतर हे सर्वजण निघण्यासाठी मोटारीत बसले. त्यावेळी नियुक्तीपत्रे न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी राडा करण्यास सुरुवात केली.

याप्रसंगी मान्यवरांना गाडीतून खाली उतरून कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कार्यकर्त्यांनी आताच नियुक्तीपत्रांचे वाटप व्हावे, असा हट्ट धरला. अखेर आमदार विक्रम काळे यांच्या मध्यस्थीने काही नियुक्तीपत्रांचे वाटप तेथेच पायऱ्यावर करावे लागले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मंत्री आणि आमदारांच्या मोटारींना जाण्यास वाट करून दिली.

Dharashiv, Sanjay Bansode, Ajit Pawar
Rebel Political Party : पक्षातून फुटलेल्यांना आता चपराक बसणार; मुंबई हायकोर्टातील याचिकेवर लवकरच सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे गट आहेत. आता राज्यात निवडणुका जशा जवळ येतील तसे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये आणखी वाद वाढल्याचे स्पष्ट होऊ लागले आहेत. यातून मार्ग काढून कोणता गट प्रभावी हे येणाऱ्या काही निवडणुकांनंतरच आपणाला कळणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com