Dhananjay Munde News : अशीच बदनामी सुरू राहिली तर पुढच्या महिन्यात..! धनंजय मुंडेंना सतावतेय ‘ही’ भीती

Jyotirlinga Santosh Deshmukh Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबीरात धनंजय मुंडे रविवारी सहभागी झाले होते.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Crime : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. बीड आणि परळीची बदनामी करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली. तसेच एक भीतीही त्यांना असल्याचे मुंडेंनी सांगितले.

शिर्डीतील भाषणाचे मुद्दे मुंडे यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट केले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर झालेल्या मीडिया ट्रायल, सोशल मीडियावरील चिखलफेक, काहींनी साधलेले राजकारण अशा अनेक गोष्टींनी जिल्ह्याचे सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे.

Dhananjay Munde
Dhananjay Munde : गंभीर आरोपांनी घायाळ झालेल्या मुंडेंनी अखेर पलटवार केलाच; म्हणाले, मला काय बदनाम करायचं ते करा,पण...

आपला पक्ष शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे आता आमच्या बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी सुद्धा सर्वांना घ्यावी लागेल. ऊसतोड करून, कष्ट करून, कोरडवाहू शेती करून जगणारे आम्ही सामान्य लोक आहोत, असे मुंडे म्हणाले आहेत.  

आमचा जिल्हा बिहार आणि आमची परळी तालिबान नाही. अशीच बदनामी सुरू राहिली तर पुढच्या महिन्यात महाशिवरात्री आहे, बारा ज्योति्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ यांच्या दर्शनाला भाविक येतील का, अशी भीती वाटत असल्याचे सांगून परळीची बदनामी थांबवा, असे आवाहन केल्याचे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Dhananjay Munde
Sunil Tatkare News : धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद कोणी दिले नाही? सुनील तटकरेंनी थेटच सांगितले कारण

बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्व.संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे, याची मनात खंत आहे, असेही मुंडेंनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com