"२६/११ हल्ल्यात परमबीर सिंगानी दहशतवाद्यांना मदत केली, कसाबचा मोबाईलही गायब"

परमबीर सिंग नव्या वादात...
Parambir Singh
Parambir SinghSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यामागील वादाचे शुक्लकाष्ट संपताना दिसत नाही. न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोप प्रकरणात फरारी घोषित केल्यानंतर आता परमबीर सिंग यांच्यावर २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईचे निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी परमबीर सिंग यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे.

याबाबत पठान यांनी जुलै महिन्यात राज्याचे गृहमंत्री व मुंबईचे पोलिस आयुक्त यांना एक पत्र लिहिले होते. यात ते म्हणाले होते, २६/११ मधील दहशतवाद्यांना परमबीर सिंह यांनी मदत केली. पठाण यांनी आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, परमबीर सिंग यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल त्यावेळी स्वत:कडे ठेवून घेतला होता.

२६ /११ च्या हल्यावेळी परमबीर सिंह हे एटीएसमध्ये कार्यरत होते. आज तागात तो कसाबचा मोबाइल तपास यंत्रणेच्या हाती लागला नसल्याचे आरोप पठान यांनी केले आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला होता, त्यानंतरही त्यांनी तो मोबाईल क्राइम ब्रँचकडे सोपवला गेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी करण्याची विनंती पठाण यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com