Mahadev Jankar: लोकसभेचं मतदान पार पडताच जानकरांचं खळबळजनक विधान; म्हणाले, 'मेलो तरी चालेल पण कमळ चिन्हावर...'

Mahadev Jankar Latest Statement: दुसऱ्याच्या महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक बनून राहणं चांगलं. असं वक्तव्य महायुतीचे परभणी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केलं आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Mahadev Jankar News: "मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण अशा दुसऱ्या पक्षांच्या चिन्हावर कधीही निवडणूक लढवणार नाही." असं वक्तव्य महायुतीचे परभणी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केलं आहे. तसेच दुसऱ्याच्या महालात जाऊन गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत मालक बनून राहणं चांगलं. माझी विचारसरणी ही वेगळी असून ती धरूनच मी इतर पक्षांशी युती करतो असंही जानकरांनी म्हटलं आहे.

राज्यातील दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. इथे महायुतीकडून महादेव जानकर तर आघाडीकडून संजय जाधव हे निवडणूक लढवत होते. जानकर (Mahadev Jankar) यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील उपस्थित होते. आता परभणीतील मतदान पार पडल्यानंतर आपण काहीही झालं तरी दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढलो नसतो आणि लढणारही नाही असं वक्तव्य जानकर यांनी केलं आहे. तसेच काहीही झालं तरी मी माझ्याच पक्षातून आमदार-खासदार होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी पवारांना हरवलं असतं

बारामती (Baramati) शहराने 2014 साली माझ्यावर आणखी थोडं जास्त प्रेम केलं असतं तर मी पवारांना त्याचवेळी हरवलं असतं असा दावादेखील जानकार यांनी केला. ते म्हणाले, तेव्हाच्या निवडणुकीच माझं चिन्हदेखील लोकांपर्यंत पोहचलं नव्हतं, मला प्रचाराला वेळ मिळाला नव्हता. तसेच त्यावेळी मला गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी म्हटलं होतं की, 'कमळावर लढा' पण मी त्यांना नकार दिला आणि मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं ठरवलं. मेलो तरी चालेल पण कमळ, हात, धनुष्यबाण या चिन्हावर मी निवडणूक लढवणार नाही. मी पक्ष काढलेला आहे आणि माझ्याच पक्षावर मला आमदार-खासदार व्हायचं आहे, असं जानकर म्हणाले.

Mahadev Jankar
Shivsena Vs BJP: प्रसाद लाड यांनी ठाकरेंना डिवचलं; म्हणाले, उद्धव यांची गत 'उंदीर गेला लुटी...'

अंतरवाली सराटीमधून 70 टक्के मतदान घेणार

परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम दिसून आला. त्यामुळे परभणीत जानकर यांच्या मतावर मराठा आंदोलनाचा परिणाम होणार का? याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. शिवाय यंदा मराठ्यांनी कुणाला विजयी करण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठी मतदान करावं असं आवाहन आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर बोलताना जानकर म्हणाले, परभणीतून मीच निवडून येणार. शिवाय मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीमधून 70 टक्के मतदानही घेणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com