Prasad Lad On Uddhav Thackeray: स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेसला धरले, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडले. काँग्रेसच्या (Congress) म्हणण्यानुसार लांगूलचालन सुरु केले, उबाठा गट आता काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न उपस्थित करत महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी, "काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फरक नाही. उद्धव ठाकरे देखील आपल्याच विचारधारेचे आहेत. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. यामुळे येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात," असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं असून हे प्रादेशिक पक्ष नेमके कोणते याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पवारांच्या या वक्तव्यावरुन भाजपने (BJP) मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करायला सुरुवात केली आहे. अशातच आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी' अशी अवस्था ठाकरे गटाची झाली असल्याचे म्हटले आहे.
लाड यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेसला धरले! माझ्या तमाम हिंदू बांधवांनो ... म्हणणे सोडले! काँग्रेसच्या म्हणण्यानुसार लांगूलचालन सुरु केले! उबाठा गट आता काँग्रेसमध्ये विलीन होणार का? उद्धव ठाकरे यांची गत 'उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी' (अर्थ-प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो) अशी झालीय.
शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार समान विचारधारेचा छोटा प्रादेशिक पक्ष उबाठा गट पण काँग्रेसमध्ये विलीन होणार का? काँग्रेस सरकारच्या काळात देशावर झालेले विविध हल्ले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी 26/11 च्या हल्ल्याबद्दल केलेला देश विरोधी दावा आणि काँग्रेसचा राम मंदिराला असलेला विरोध!
हे सर्व उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? अशा काँग्रेसी विचारधारेला भाजपचा कायमच विरोध असेल!, परंतु उद्धव ठाकरेंना हे सर्व मान्य आहे का?" असे अनेक प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता लाड यांच्या टीकेला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देतो हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.