Shashikant Shinde News: वैद्यकीय महाविद्यालयात १ कोटींच्या भंगारावर दरोडा; शशिकांत शिंदेंचा रोख नक्की कोणाकडे?

ग्रामपंचायत निकालानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारण तापलं आहे.
MLA Shashikant Shinde
MLA Shashikant Shinde
Published on
Updated on

Satara Politics : ग्रामपंचायत निकालानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारण तापलं आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेत कोरेगावच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी दरोडा टाकत सुमारे एक कोटींच्या किमतीचे स्टील भंगारात विकले, असा आरोप राष्ट्रवादीचे (NCP) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केला आहे.

ग्रामपंचायत निकालानंतर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगलं आहे. शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदेंवर धक्कादायक आरोप केले आहेत. ''महेश शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयच्या जागेतील जवळपास १ कोटींच्या किमतीचे स्टील भंगारात विकले, असा आरोप महेश शिंदे यांच नाव नं घेता शशिकांत शिंदे यांनी केला आहे. याबाबत कोणताही शासकीय विभाग याबाबत पुढे येऊन तक्रार करण्यास तयार नाही. यामुळे आता मी स्वत: याबाबच तक्रार देणार आहे आणि माझी तक्रार घेतली नाही तर मी सर्व शासकीय विभागांना न्यायालयात खेचणार आहे, असे दावा त्यांनी सांगितले.

MLA Shashikant Shinde
Winter Session 2022 : नगरमध्ये जबरदस्तीने धर्मांतर: राम सातपुतेंच्या लक्षवेधीने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

तर दूसरीकडे कुमठ्याची टाकी पाडली, याचं मोठं राजकीय भांडवल करत गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, एवढ्या मोठ्या प्रकरणात साधी तक्रार सुद्ध केली गेली नाही हे आश्चर्याची बाब आहे. महेश शिंदे हे सुडबुद्धीचं राजकारण करत असल्याची टिका शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

महाविद्यालयाच्या जागेतील जवळपास 1 कोटीचे स्टिल भंगारात विकले गेल्यानंतर शासकीय यंत्रणेने तक्रार देणे गरजेचे होते. पण आजपर्यंत या दरोड्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली नसेल तर हा दरोडा नियोजित आहे का, असा सवालही शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच जर हा दरोडा नियोजित असेल तर नक्की या दरोड्यात कोणाकोणाचा सहभाग होता, हेही शोधणेही गरजेचे असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच दरोडा पडल्यानंतर तातडीने तक्रार न दिल्याने सर्वात आधी जबाबदार अधिकाऱ्याचे निलंबन आणि त्याच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. याशिवाय यात आणखी कोणाचा समावेश होता, हे पाहणेही गरजेचे असल्याचे शिंद यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com