बंगळुरूचे 178 साईभक्त अडकले शिर्डी विमानतळावर

बंगळुरूमधील विमानाच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने 178 साईभक्तांना मनस्ताप सहन करावा लागला.
Shirdi Airport
Shirdi AirportSarkarnama
Published on
Updated on

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - शिर्डी हे जगभरातील प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे जगभरातील साईभक्त शिर्डीला विमानाने अथवा वाहनाने येतात. मात्र बंगळुरू मधील विमानाच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने 178 साईभक्तांना मनस्ताप सहन करावा लागला. ( 178 Sai devotees from Bangalore stranded at Shirdi airport )

वैमानिकाच्या आसनाच्या डाव्या बाजूला असलेली काच तडकल्याने बंगळुरू येथून आलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले. काल (रविवारी) दुपारी अडीच सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या विमानात सुमारे एकशे अठ्याहत्तर प्रवासी असल्याचे सांगण्यात आले. परतीचे उड्डाण रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. कंपनीने त्यांची निवास व भोजन व्यवस्था केली.

Shirdi Airport
नगर-शिर्डी रस्त्या लगतच्या चरात शिक्षिकेचा मृत्यू : नेते या मृत्यूची जबाबदारी घेणार का?

विमानतळावरून मिळालेल्या माहिती नुसार, आज दुपारी अडीचच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरताना हा प्रकार घडला की हवेच्या दाबाने त्यापूर्वी या काचेला तडा गेला, याबाबत निश्‍चित माहिती समजू शकली नाही. तथापि ही वेगळ्या प्रकारची आणि उच्च दाब सहन करणारी काच असते. त्यात धातूंचे मिश्रण असल्याने अन्य काचेच्या तुलनेत ती वेगळी असते. तडा गेलेला भाग बदलण्यासाठी दिल्ली येथून तंत्रज्ञांचे एक पथक आणि हा नवा सुटा भाग मागविण्यात येणार आहे. पंधरा ते वीस मिनिटांत तो नवा भाग बसविला जाईल. उद्या सकाळी अकराच्या दरम्याने हे विमान उड्डाण करण्यासाठी पुन्हा तयार होईल.

Shirdi Airport
शिर्डी विमानतळाला ग्रामपंचायत लावणार कुलूप

तांत्रिक कारणामुळे या विमानाचे परतीचे उड्डाण रद्द करावे लागले. आपल्याकडे अद्याप नेमकी माहिती आलेली नाही. तथापि, ज्या पारदर्शी भागाला तडा गेला, त्याला काच म्हणता येणार नाही. मात्र उड्डाण केल्यानंतर तडा गेलेल्या ठिकाणी हवेचा दाब सहन करता येणार नाही, या कारणास्तव उड्डाण रद्द झाले. उद्या तो भाग बदलून विमान पूर्ववत बंगळुरूकडे रवाना होईल.

- सुशील श्रीवास्तव, संचालक, शिर्डी विमानतळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com