Supriya Sule On Thane Hospital Incident : ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत १७ रूग्ण दगावले; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना म्हणतात...

Supriya Sule To Eknath Shinde : यापूर्वीही १० ऑगस्टच्या रात्री याच रुग्णालयात ५ रुग्णांची मृत्यू झाल्याची घटना..
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Thane News : ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री १७ रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर यापूर्वीच १० ऑगस्ट रोजी याच रूग्णालयात ५ रूग्णांची मृत्यू झाल्याचीही बाब समोर आली होती. या घटनेनंतर आत बराच गदारोळ सुरू झाला आहे. (Latest Marathi News)

एकाच रात्री १७ रुग्णांच्या मृत्यूमुळे विविध राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या रूग्णालयात मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी, अशीही मागणी केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनात शिंदेंना आवाहन केले आहे. (Latest Marathi News)

Supriya Sule
Solapur Politics : राष्ट्रवादी प्रवेशावेळी शरद पवारांनी मला हा शब्द दिला होता;महेश कोठेंनी उघड केले गुपित

सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्याना आवाहन केले आहे. सुळे म्हणाल्या, "ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापूर्वी देखील एकाच दिवशी जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. डॉक्टरांची अपुरी संख्या, अपुरी सामुग्री आदी कारणांमुळे या घटना घडत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. याकडे मुख्यमंत्री ठाणे महापालिका आणि आरोग्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष देऊन सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे."

Supriya Sule
Supriya Sule In Parliament : मोदी सरकारने नऊ वर्षात नऊ सरकार पाडली; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

१० ऑगस्ट रोजी ५ रुग्णांचा मृत्यू झाला :

आज ही घटना समोर आलेली असतानाच यापूर्वीही १० ऑगस्टच्या रात्री याच रुग्णालयातील ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रुग्णालयातल्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचा अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे या घटना वारंवर घडत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com