Karad Maratha Protest : ओबीसीतून आरक्षणासाठी कऱ्हाडला २०० गावे चक्री उपोषण करणार...

Maratha Kranti Morcha मराठा क्रांती मोर्चाची पुढील आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
Karad Maratha Protest
Karad Maratha Protestsarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Karad Maratha Protest : मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देऊन या समाजाच्या आंदोलनात फुट पाडण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. त्यास आमचा विरोध आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला ५० टक्के मर्यादेत ओबीसीतून आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी १३ सप्टेंबरपासुन मराठा समाजाच्यावतीने चक्री उपोषण सुरु करण्यात येईल. त्यात कऱ्हाड (जि.सातारा) तालुक्यातील २०० गावे सहभागी होतील. त्यातूनही काही मार्ग न निघाल्यास बेमुदत उपोषणास प्रारंभ करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाची Maratha kranti Morcha पुढील आंदोलनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयाोजन करण्यात आले होते. मराठा बांधवांची महाराष्ट्रात मोठी संख्या आहे. मात्र, या समाजाला गेली अनेक वर्षे आरक्षणाभोवती Maratha Reservation झुलवत ठेवले आहे. समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून यापूर्वी अनेक मोर्चे शांततेने झाले. जालना जिल्ह्यातही आंदोलन सुरु असताना तेथे पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. त्याची जबाबदारी घेऊन गृहमंत्री यांचा राजीनामा घ्यावा आणि लाठीहल्ला करणाऱ्या पोलिस उपअधीक्षकाला सक्तीच्या रजेवर न पाठवता बडतर्फ करावे, अशी मागणी आहे.

राज्यातील प्रत्येक जातीची लोकसंख्या तपासून त्या जातीला आरक्षण दिले पाहिजे. सध्या काही जातींना दिलेले आरक्षण हे फुगीर आरक्षण असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकदा सर्वच आरक्षणाच्या लोकसंख्येची शहानिशा करणे गरजेचे आहे. त्यातुन मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येते हे सांगण्याची वेळ आली तर आम्ही ते कसे देता येईल दाखवून देऊ.

Karad Maratha Protest
Shashikant Shinde on Jalana Protest : लाठीहल्ल्यावरुन शशिकांत शिंदे भडकले; म्हणाले, भाजपचा सत्तेचा माज उतरवला जाईल...

आमची लढाई प्रशासनाशी, पोलिसांबरोबर नाही. आमची लढाई ही हक्काची असून शासनाशी आहे. राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची मागणी असून त्यासाठी आम्ही कऱ्हाड तालुका मराठा मोर्चाच्यावतीने १३ सप्टेंबरपासून चक्रीउपोषण सुरू करत आहोत.

त्यामध्ये तालुक्यातील २०० गावातील लोक सहभागी होती. त्यातूनही मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. त्यातून चांगले वाईट परिणाम होतील याला राज्यशासन, प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

Edited By Umesh Bambare

Karad Maratha Protest
BJP Former MP-MLA Will Join NCP: एकनाथ खडसे देणार भाजपला दणका; माजी खासदार, माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com