Karad Congress News : नवाब मलिकांना जामीन देण्यामागे राजकारण : पृथ्वीराज चव्हाण यांचा संशय

Prithviraj Chavan आमदार चव्हाण यांनी मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नवाब मलिक यांना चुकीच्या पध्दतीने अटक करण्यात आली.
Prithviraj Chavan,Nawab Malik
Prithviraj Chavan,Nawab Maliksarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Karad Congress News : माजी मंत्री नवाब मालिक यांना जामीन देण्यामागे राजकारण असावे. मालिकांवर दबाव आणून राजकीय भूमिका घ्यायला भाग पाडले असावे. कारण त्यांच्या जामीनाला ईडी, सीबीआय, एनआयई व अन्य कोणत्याही तपास यंत्रणेने विरोध केलेला नाही. त्यांनी विरोध न करणे हे बरेच काही सुचक आहे, असा संशय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नवाब मलिक Nawab Malik यांना चुकीच्या पध्दतीने अटक करण्यात आली. त्यांना नुकताच जामीन मिळाला आहे.

ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाबरोबर जातील हे ते जाहीर करतील. त्यांची प्रकृती खराब आहे. मात्र त्यांना जामीन मिळण्यामागे राजकारण असावे, अशी शंका आहे. मालिकांवर दबाव आणून राजकीय भूमिका घ्यायला भाग पाडले असावे. कारण त्यांच्या जामीनाला ईडी, सीबीआय, एनआयई व अन्य कोणत्याही तपास यंत्रणेने विरोध केलेला नाही. त्यांनी विरोध न करणे हे बरेच काही सुचक आहे.

आमदार राठोडांवरील हल्ल्याचा निषेध

जालन्याचे काँग्रेस आमदार राजेश राठोड यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. राठोड यांनी आदिवासी यांच्या प्रमाणपत्राचा मुद्दा विधानसभेत उचलून धरला.

Prithviraj Chavan,Nawab Malik
Satara Political News : साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन

आदिवासींची खोटी प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी याचा लाभ घेतला होता, अशा लोकांकडून राठोड यांना वारंवार धमक्या सुद्धा येत होत्या. तरीसुद्धा राजेश राठोड यांनी आपला मुद्दा आक्रमकपणे मांडला. त्यावर चिडून बोगस प्रमाणपत्र लाभार्थी यांनी हा हल्ला केला आहे त्यामुळे राजेश राठोड यांना पोलीस संरक्षण द्यावे तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी श्री. चव्हाण यांनी केली.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com