श्रीरामपूर ( अहमदनगर ) : श्रीरामपूर ( Shrirampur ) तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार काल ( मंगळवार ) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. 37 nominations filed for Ashok's factory election
या निवडणुकीसाठी आज ( बुधवारी ) दिवसभरात 34 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. काल (मंगळवार) पर्यंत तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर आज 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले. असून 35 उमेदवारांनी आज अखेर 37 अर्ज दाखल केले. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह समर्थकांनी उमेदवारी अर्ज भरले. यात आदिक गटातर्फे देखील अर्चना पानसरे, खंडेराव पटारे व प्रा. कालर्स साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर मुरकुटे यांच्या पॅनलच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी शेतकरी संघटना सरसावली आहे.
शेतकरी संघटनेचे अॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानीचे कार्यकर्ते व आदिक समर्थक एकवटे आहे. तसेच माजीमंत्री, भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील समर्थक व आमदार लहू कानडे यांचे कार्यकर्ते देखील कारखाना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
आज अभिषेक खंडागळे, डॉ. वंदना मुरकुटे, नितीन बनकर, अनिल औताडे, सारंगधर आसने, आदिनाथ झुराळे, देविदास सलालकर, कल्याण लकडे, खंडेराव त्रिभुवन, कल्पना पटारे, बाबासाहेब आदिक, दिनकर गायकवाड, खंडेराव पटारे, यशवंत बनकर, यशवंत रणनवरे, दत्तात्रय नाईक, हिराबाई साळुंके, मंजाबापू थोरात, ज्ञानेश्वर शिंदे, कैलास पवार, ज्ञानदेव पटारे, संदीप आदिक, सर्जेराव कापसे, हरिभाऊ जाधव, रवींद्र पटारे, पुजाहरी शिंदे, निलेश आदिक, भगीरथ जाधव, शांताबाई जाधव, उषा पटारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.