Sangola Assembly Elections : "जप्त केलेल्या 5 कोटींशी माझा संबंध नाही, पण तो कार्यकर्ता..."; राऊतांच्या आरोपावर शहाजीबापूंचं स्पष्टीकरण

Shahajibapu Patil on Sanjay Raut : पुण्यातील खेड-शिवापूर टोल नाक्यावर पुणे पोलिसांनी सोमवारी रात्री एका वाहनातून तब्बल 5 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. जप्त केलेली रक्कम शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Shahajibapu Patil on Sanjay Raut
Shahajibapu Patil on Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 22 Oct : पुण्यातील खेड-शिवापूर टोल नाक्यावर पुणे पोलिसांनी सोमवारी (ता.21) रात्री एका वाहनातून तब्बल पाच कोटी रुपयांची रक्कम जप्त केली.

जप्त केलेली रक्कम शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मात्र, हे सर्व आरोप आमदार शहाजीबापू पाटील यांनी फेटाळून लावले.

शिवाय माझ्या बदनामीसाठी असे आरोप केले जात असल्याचंही पाटील यांनी म्हटलं. ते म्हणाले, "मी 5 कोटींची रोकड जप्त केल्याची बातमी टीव्हीवर पाहिली. यामध्ये कुठेही माझं नाव आलेलं नाही. शिवाय ज्या गाडीत पैसे सापडले त्या गाडीशी माझा संबंध नाही."

मात्र यावेळी त्यांनी ज्या गाडीत ही रक्कम सापडली तो आपल्यासोबतच काम करत असल्याचं सांगितलं, ते म्हणाले, "अमोल नलावडे हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याचे वडील या पक्षाचे पदाधिकारी होते. मागील दोन वर्षांपासून तो माझ्यासोबत शिवसेनेचं काम करत आहे. त्यांचे अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत. मात्र, आता सापडलेल्या पैशांचं नेमकं प्रकरण काय आहे हे मला माहिती नाही."

Shahajibapu Patil on Sanjay Raut
Maharashtra Assembly Election 2024: संदीप नाईक यांनी वाजवली 'तुतारी'; निलेश राणे उचलणार 'धनुष्यबाण'

दरम्यान, ही रक्कम शहाजीबापू पाटील (MLA Shahjibapu Patil) असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसतात. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही.

सांगोला (Sangola) म्हटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा येतो, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. शिवाय सांगोला मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्यामुळे माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचलं जात असल्याचंही पाटील म्हणाले.

Shahajibapu Patil on Sanjay Raut
Sanjay Raut : पुण्यातील टोलनाक्यावरून पोलिसांनी जप्त केलेले 5 कोटी शिंदे गटातील आमदाराचे? राऊतांचा रोख कुणाकडे?

संजय राऊत नेमक काय म्हणाले?

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटमध्ये लिहिलं, "मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले! हे आमदार कोण? 'काय झाडी…, काय डोंगर…' मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके?"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com