Sanjay Raut : पुण्यातील टोलनाक्यावरून पोलिसांनी जप्त केलेले 5 कोटी शिंदे गटातील आमदाराचे? राऊतांचा रोख कुणाकडे?

Khed Shivapur Toll Naka Cash Seizure: राज्यात आचारसंहिता लागू झाली असतानाच पुण्यातील खेड-शिवापुर टोल नाक्यावर पोलिसांनी एका वाहनातून तब्बल 5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. तर हे पैसे शिंदे गटातील आमदाराचे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Eknath Shinde, Sanjay Raut
Eknath Shinde, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 22 Oct : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन देखील अलर्ट झालं आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जातात.

अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. याच तपासणी अंतर्गत पुणे (Pune) ग्रामीण पोलिसांनी एका वाहनातून तब्बल पाच कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

राज्यात आचारसंहिता लागू झाली असताना एवढी मोठी रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवाय या घटनेवरून राजकारण देखील तापलं आहे. पुण्यातील (Pune) खेड-शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही रक्कम जप्त केली.

Eknath Shinde, Sanjay Raut
Mahayuti vs MVA : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु; महायुती, मविआत जोरदार रस्सीखेच

त्यानंतर या पैशांची चौकशी करण्यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि आयकर विभागाच्या अधिकारी या घटनची सखोल चौकशी करत आहेत. मात्र, ही रक्कम कोणाची होती, ती कुठे घेऊन निघाले होते याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली नाही.

Eknath Shinde, Sanjay Raut
Mahadev Jankar News : 'तुने मुझे एक धोखा दिया है, मै तुम्हे सौ धोखे दूंगा…'; जानकरांचा 'या' भाजप उमेदवाराला इशारा

अशातच या घटनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप केला आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, "मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले! हे आमदार कोण? 'काय झाडी…, काय डोंगर…' मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके?" असा आरोप राऊतांनी शिंदे गटावर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com