Khatav Bribe News : जप्त डंपर सोडण्यासाठी मागितले ५५ हजार; महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

Khatav Tahashildar क्रश सॅण्ड व क्रश खडीची वाहतूक करीत असताना खटावच्या तहसिलदारांनी कारवाई करुन दोन्ही डंपर जप्त केले होते.
Bribery
Briberysarkarnama
Published on
Updated on

Satara Bribe News : खटावच्या तहसिलदारांनी जप्त केलेले दोन डंपर सोडविण्यासाठी ५५ हजारांची मागणी करुन ती रक्कम स्वीकारताना वडुज (ता. खटाव) तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यकाला आज लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.

महसूल विभागाच्या कार्यालयात सध्या लाच मागणीचे प्रकार अधिकच वाढले आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अशा लोकसेवकांबाबत तक्रार आल्यानंतर त्यांना सापळा रचून पकडत आहे. वडुज तहसिल कार्यालयातही अशाच प्रकारे महसूल सहाय्यकाला आज तब्बल ५५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक Bribe विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मालकीचे दोन डंपर असून ते बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करतात. हे दोन्ही डंपर १६ नोव्हेंबरला क्रश सॅण्ड व क्रश खडी भरून वाहतूक करीत असताना खटावच्या तहसिलदारांनी कारवाई करुन दोन्ही डंपर जप्त केले होते.

हे दोन्ही डंपर सोडविण्यासाठी तहसिल कार्यालय खटाव येथील महसूल सहाय्यक प्रविण धर्मराज नांगरे (वय ४२, रा. तडवळे, ता. खटाव) यांनी स्वतःसाठी तक्रारदार यांना ५५ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रारदाराने लेखी अर्ज केल्यानंतर या विभागाने वडुज तहसिल कार्यालयात सापळा रचला. Maharashtra Political News

Bribery
Satara Maratha Reservation : कुणबी शब्दाची लाज वाटते; शेती विकून चंद्रावर जावा...जरांगे पाटलांचा सल्ला

तसेच रक्कम स्वीकारल्यावर महसूल सहाय्यक नांगरे यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक सचिन राऊत, विक्रम पवार, पोलिस हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे, प्रियांका जाधव, निलेश येवले, तुषार भोसले, शितल सपकाळ यांनी सहभाग घेतला.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com