Market Committee Election : अकलूजमध्ये मदनसिंह, पद्मजादेवी मोहिते पाटील, उत्तम जानकरांसह ८१ जणांचे अर्ज दाखल

पद्मजादेवी यांनी महिला गट आणि ग्रामपंचायत गटातूनही अर्ज भरला आहे.
Uttam Jankar-Padmajadevi Mohite Patil
Uttam Jankar-Padmajadevi Mohite PatilSarkarnama

अकलूज /नातेपुते (जि. सोलापूर) : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १८ जागांसाठी ८१ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे यांनी दिली. सहकारी संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण गटातून मदनसिंह मोहिते-पाटील, मारुतराव रुपनवर, पद्मजादेवी मोहिते पाटील, उत्तम जानकर या प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात पद्मजादेवी यांनी महिला गट आणि ग्रामपंचायत गटातूनही अर्ज भरला आहे. (81 applications filed for 18 seats of Akluj market Committee)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या सोमवार (ता. ३ एप्रिल) दिवशी सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटाच्या ७ जागांसाठी ३२ अर्ज, महिला राखीवच्या २ जागांसाठी ०८ अर्ज, इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या १ जागेसाठी ०६ अर्ज वि विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीच्या १ जागेसाठी ०५ अर्ज दाखल झाले आहेत.

Uttam Jankar-Padmajadevi Mohite Patil
Market Committee Election : दुधनीत म्हेत्रे गटाच्या दोन जागा बिनविरोध; मात्र कल्याणशेट्टींचे कडवे आव्हान : अक्कलकोटला सिद्रामप्पांविरोधात तानवडे-पाटील-शिंदे

ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटाच्या २ जागांसाठी १० अर्ज, अनुसूचित जाती किंवा जमाती गटाच्या १ जागेसाठी ०५ अर्ज, आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटाच्या १ जागेसाठी ०५ अर्ज दाखल झाले आहेत. व्यापार्याचा मतदार संघाच्या ०२ जागांसाठी ०६ अर्ज तर हमाल व तोलारी यांचा मतदार संघाच्या ०१ जागेसाठी ०४ अर्ज असे एकूण १८ जागांसाठी ८१ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी (ता. ५ एप्रिल) होणार असून वैध उमेदवारांच्या अर्जांची यादी गुरुवारी (ता ६ एप्रिल) रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Uttam Jankar-Padmajadevi Mohite Patil
Rajan Patil News : राजन पाटलांनी पुन्हा ताकद दाखवली : मोहोळ बाजार समिती बिनविरोध; ७५ वर्षांपासून वर्चस्व कायम

उमेदवारांची मतदारसंघनिहाय यादी

सहकारी संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण गट : मदनसिंह मोहिते-पाटील, मारुतराव रुपनवर, शिवाजी चव्हाण, नितीन सावंत, शहाजीराव देशमुख, बाबुराव कदम, बाळासाहेब माने देशमुख, रामचंद्र गायकवाड, मालोजीराजे देशमुख, श्रीनिवास कदम पाटील, पद्मजादेवी मोहिते पाटील, नागेश काकडे, रणजितसिंह देशमुख, उत्तम जानकर, बाळासाहेब सावंत, मधुकर वाघमोडे, राहुल सावंत, गणेश इंगळे, पांडुरंग पिसे, पांडुरंग वाघमोडे, अजित बोरकर, राजेंद्र वाळेकर, दादासाहेब लाटे, शरद पाटील लक्ष्मण पवार‌

Uttam Jankar-Padmajadevi Mohite Patil
Arvind Sawant on controversial statement : तो शब्द शरद पवारांचा नव्हे; तर माझा : अरविंद सावंतांनी वादावर टाकला पडदा

सहकारी संस्था मतदार संघ महिला राखीव संघ : मेघा साळुंखे, अमृता सुरवसे, रोहिणी खराडे, पद्मजादेवी मोहिते पाटील, शोभा कागदे, सोनाली पाटील

इतर मागासवर्गीय गट : भानुदास राऊत, दत्तात्रय पिसे, भीमराव फुले, उत्तम बरडकर, पोपट बोराटे

विमुक्त जाती भटक्या जमाती गट : संदीप पाटील, विश्वजीत पाटील, अंबादास ओरसे, अजित बोरकर

ग्रामपंचायत मतदार संघाचा सर्वसाधारण गट : बाबुराव पांढरे, लक्ष्मण पवार, विष्णू घाडगे, श्रीनिवास कदम पाटील, पद्मजादेवी मोहिते पाटील, केशवराव पाटील, तानाजी जगदाळे, शहाजीराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

अनुसूचित जाती-जमाती गट : दत्तू लोखंडे, रामचंद्र डावरे, उत्तम जानकर, मिलिंद सरतापे

आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट : पोपट भोसले, यशवंतराव घाडगे, रामचंद्र गोडसे, राहुल सावंत

व्यापारी मतदारसंघ : आनंदा फडे, महावीर गांधी, मोहसीन बागवान, दीपक गरड

हमाल व तोलार मतदारसंघ : उद्धव डांगरे, रवींद्र भोसले, संजय कोळेकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com