Vasantrao Kale Sugar Factory Election : 'सहकार शिरोमणी' कारखान्यासाठी ९३.९७ टक्के मतदान; काळे की पाटील कोण बाजी मारणार ?

Pandharpur News : अभिजित पाटील यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली होती.
Sahkar Shiromani Sugar factory Election
Sahkar Shiromani Sugar factory ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur : भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी कल्याणराव काळे यांच्या पॅनेलच्या विरोधात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी मोठे आव्हान उभे केले होते. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१६) ९३.९७ टक्के मतदान झाले. यानंतर दोन्ही बाजूने प्रतिष्ठेच्या केल्या गेलेल्या या निवडणुकीत काळे आपलं वर्चस्व कायम राखणार की पाटील विजयाचा गुलाल उधळणार याचा निकाल रविवारी(दि.१८) लागणार आहे.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत(Vasantrao Kale Sugar Factory Election) जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सत्ताधारी कल्याणराव काळे आणि विरोधी अभिजित पाटील यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी आज दिवसभर धावपळ केली. अखेर शुक्रवारी ९३.९७ टक्के मतदान झाले. एकूण १० हजार १३७ सभासदांपैकी ९ हजार ५२६ सभासदांनी मतदान केले. मतदानानंतर दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे.

Sahkar Shiromani Sugar factory Election
Vasantrao Kale Sugar Factory Election: कल्याणराव काळेंना पहिला धक्का; दीपक पवार, बी. पी. रोंगे यांचे अर्ज मंजूर

काळे आणि पाटील अशा दोन्ही गटाकडून सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतील सभासदांना मतदानासाठी प्रवृत्त करून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात आले. दोन्ही बाजूने प्रतिष्ठेच्या केल्या गेलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याविषयी उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

कल्याणराव काळे(Kalyanrao Kale) यांच्या बाजूने ‘विठ्ठल’चे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, युवराज पाटील आणि गणेश पाटील यांनी तर अभिजित पाटील यांच्या बाजूने ॲड. दीपक पवार, प्रा. डॉ. बी. पी. रोंगे यांनी जोरदार प्रचार केला होता. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी शुक्रवारी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदान चुरशीने परंतु शांततेत पार पडली.

Sahkar Shiromani Sugar factory Election
BJP & Shivsena : युतीतील वादावर 'असा' पडला पडदा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह खासदार शिंदेंच्या मेगा बैठकीत काय घडलं ?

सत्ताधारी कल्याणराव काळे यांचे वडील (कै.) वसंतराव काळे यांनी या कारखान्याचे संस्थापक- अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले. त्यांच्या पश्चात गेली बावीस वर्षे कल्याणराव काळे हे या कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. आपल्या ताब्यातील हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहिला पाहिजे यासाठी काळे यांनी प्रयत्न केलं. तर हा कारखाना जिंकून पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील नवे नेतृत्व म्हणून शिक्कामोर्तब करून घेण्यासाठी अभिजित पाटील(Abhijit Patil) यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली होती.

आज तालुक्यातील वाडी- वस्तीवरील सभासद शेतकऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते दिवसभर धावपळ करत होते. सभासदांना प्रत्यक्ष भेटून त्यांना मतदान करण्यासाठी कार्यकर्ते सर्व ते प्रयत्न करत होते. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आज मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदान चुरशीने परंतु शांततेत पार पडली.

Sahkar Shiromani Sugar factory Election
Fadnavis on Thackeray: बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व सोडून दिल्याचं जाहीर करा; फडणवीसांचं ठाकरेंना थेट आव्हान

उद्या मतमोजणी

कारखान्याच्या १० हजार ८८२ सभासदांपैकी ७८५ सभासद मयत झालेले असल्याने एकूण मतदार संख्या १० हजार १३७ होती. त्यापैकी ९ हजार ५२६ सभासदांनी आज मतदान केल्याने ९३.९७ टक्के मतदान झाले. मतदानानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा केला जात आहे. पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याविषयी उत्सुकता आहे. रविवारी (ता. १८) शासकीय गोदामामध्ये मतमोजणी होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com