Vasantrao Kale Sugar Factory Election: कल्याणराव काळेंना पहिला धक्का; दीपक पवार, बी. पी. रोंगे यांचे अर्ज मंजूर

Vasantrao Kale Sakhar Karkhana Election: पवार आणि रोंगे यांच्या उमेदवारी अर्जामुळे कारखान्याची निवडणूक अधिक रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.
Vasantrao Kale Sugar Factory Election
Vasantrao Kale Sugar Factory ElectionSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी कल्याणराव काळे गटाच्या विरोधात दीपक पवार-डॉ. बी.पी. रोंगे-आभिजित पाटील हा गट आमने सामने येणार, हे आता स्पष्ट झाले आहे. (First blow to Kalyanrao Kale : Deepak Pawar, B. P. Ronge's application approved)

उमेदवारी छाननीमध्ये दोघांचेही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरवले आहेत. पवार आणि रोंगे यांच्या उमेदवारी अर्जामुळे साखर कारखान्याची (Sugar Factory) निवडणूक (Election) अधिक रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.

Vasantrao Kale Sugar Factory Election
Makai Sugar Factory Election : मातब्बर विरोधकांचे अर्ज बाद; 'मकाई'ची सत्ता चौथ्यांदा मिळविण्याकडे बागलांची वाटचाल

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली होती. त्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांच्या उमेदवारांवर अक्षेप नोंदविले होते. यामध्ये प्रामुख्याने दीपक पवार, बी.पी. रोंगे, धनंजय काळे, कल्याणराव काळे यांचा समावेश होता. दोन गटाच्या आक्षेपावर शनिवारी सुनावणी झाली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी निकाल राखून ठेवला होता.

निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी आज वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये दीपक पवार, बी.पी. रोंगे यांच्यासह अभिजीत पाटील गटाच्या उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत.

Vasantrao Kale Sugar Factory Election
Karjat Bazar Samiti : कर्जत बाजार समितीच्या दोन जागांची फेरमतमोजणी; रोहित पवार- राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

पाटील-रोंगे-पवार गटाचे अर्ज मंजूर झाल्याने निवडणूक चुरशीने होणार हे आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज वैध ठरल्याचे जाहीर होतात दीपक पवार व डॉ. बी. पी रोंगे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. येत्या पाच जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे, त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष पाच तारखेकडे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com