Gopichand Padalkar Brother News : मिरज शहरात मध्यरात्री दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशानं मिळकती पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी त्यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मिरजेतील वादग्रस्त जागेवरून पडळकरांच्या बंधूंना जोरदार दणका दिला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजमध्ये केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली होती. पडळकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री काही दुकाने आणि हॉटेलं पाडली होती. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, एमआयएम, आरपीआयसह विविध सामाजिक संघटनांनी बंदचं आवाहन केलं आहे.
मिरज शहरातील जमीनदोस्त करण्यात आलेल्या दुकाने व हाॅटेलच्या वादग्रस्त जागेप्रकरणी मिरज तालुका न्यायदंडाधिकारी दगडू कुंभार यांनी महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यांनी वादग्रस्त ठरलेल्या जागेप्रकरणी मिरज तालुका न्यायदंडाधिकारी दगडू कुंभार यांनी निकाल देताना मिळकतदारांचा कब्जा तात्पुरता मान्य करतानाच ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांना आवश्यकता भासल्यास योग्य त्या ठिकाणी दाद मागण्याची सूचना देखील केली आहे.
याचवेळी त्यांनी पाडकाम झालेल्या ठिकाणी लागू करण्यात आलेलं 145 देखील कलम देखील तालुका न्याय दंडाधिकारी यांनी हटवलं आहे.
सांगलीतील मिरज शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपने जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सात मिळकती पाडल्याचा दाव स्थानिक नागरिकांनी केला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपीचंद पडळकरांकडून भावाची पाठराखण...
मिरज शहरात तोडण्यात आलेले गाळे बेकायदा होते. माझ्या भावानं काहीही चुकीचं काम केलेलं नाही असं स्पष्टीकरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलं आहे. १६ तारखेला (डिसेंबर) ब्रह्मानंद पडळकर यांनी एक नोटीस काढली होती, की २४ तासांच्या आत तुमच्या पद्धतीने अतिक्रमण काढून घ्या, महापालिकेने परवा रिमाइंड नोटीस पाठवली, की अतिक्रमण काढून घ्या, काल रात्री अतिक्रमण काढलं असं पडळकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.