राम शिंदेंसोबत विखेंनाही धक्का : रोहित पवारांनी पुन्हा निशाणा साधला...

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांचा राजकीय संघर्ष सुरू आहे.
Amol Ralebhat joins NCP
Amol Ralebhat joins NCPSarkarnama
Published on
Updated on

जामखेड ( जि. अहमदनगर ) - कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांचा राजकीय संघर्ष सुरू आहे. राम शिंदे यांना ताकद देण्यासाठी भाजपने शिंदे यांना राज्यस्तरीय भाजप कोअर कमिटीत घेतले आहे. मात्र जामखेड भाजपमधील विखे समर्थक असलेले अमोल राळेभात व सुधीर राळेभात यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जामखेडच्या राजकारणात राम शिंदे यांना झटका बसला आहे तर जिल्ह्याच्या राजकारणात विखेंना फटका बसला आहे. यात ताकद मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व रोहित पवार यांची वाढली आहे. ( A blow to Shinde in Jamkhed's politics: A blow to Vikhen in the district )

अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेले हे पक्षांतर महत्त्वाचे समजले जाते. आमदार रोहित पवारांनी मतदारसंघातील होतकरू तरुणांना पक्ष प्रवेश देऊन काम करण्याची संधी देण्याचे 'तंत्र' स्वीकारले आहे. याची प्रचिती कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी अनुभवास आली. त्याचाच पुढचा भाग जामखेड नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहायला मिळत आहे.

Amol Ralebhat joins NCP
खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर...! रोहित पवार संतापले

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात व त्यांचे थोरले बंधू बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात हे दोघे बंधू, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सखाराम भोरे, युवामोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ ओमासे, बाजार समितीचे माजी संचालक दादाहरी थोरात, सहकारातील अभ्यासू नेतृत्व विलास जगदाळे, महादेव डिसले, राजेंद्र मोटे यांनी भाजपला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रेय वारे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, सरपंच शिवाजी डोंगरे, सुनील उबाळे, संतोष निगुडे उपस्थितीत होते.

Amol Ralebhat joins NCP
रोहित पवार गडकरींना भेटताच सुजय विखें म्हणाले मी पण प्रयत्न करतोय...

राळेभात बंधू खासदार डॉ. सुजय विखे पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. पक्षांतराच्या निमित्ताने राळेभात यांनी डॉ. विखेंची साथ सोडून आमदार रोहित पवारांबरोबर गेले आहेत. राळेभात बंधूंची जामखेड तालुक्यातील सहकाराच्या राजकारणावर चांगली पकड आहे. ते बरोबर आल्याने पवारांना जामखेड तालुक्यातील सहकाराचे राजकारण सोपे झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com