Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या तीन जागांवर उभं राहणं व्यंकटेश्वर महास्वामींना भोवणार? गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Lok Sabha Election 2024: व्यंकटेश्वर महास्वामीजी हे कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील मूळ रहिवासी आहेत. 2019 साली सोलापूर लोकसभा निवडणुकीतही त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणुकीत त्यांचे डिपॉजिट जप्त झाले होते.
Venkateswara Mahaswami
Venkateswara MahaswamiSarkarnama
Published on
Updated on

Venkateswara Mahaswami: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) एका उमेदवाराला एकाचवेळी कमाल दोन मतदारसंघात उभे राहण्याची मर्यादा आहे. परंतु, व्यंकटेश्वर महास्वामी (Venkateswara Mahaswami) यांनी सोलापूरशिवाय अमरावती आणि नागपूरमधूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे तीन लोकसभा मतदारसंघात उभे राहिलेल्या महास्वामींच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

सोलापूर (Solapur) लोकसभेसाठी उमेदवारी दाखल केलेले कर्नाटकातील दीपक कटकधोंड ऊर्फ व्यंकटेश्वरा महास्वामीजी (Venkateswara Mahaswami) यांनी अमरावती आणि नागपूरमध्ये (Solapur, Amravati and Nagpur) अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवाय कर्नाटकातील विजयपुरातही त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खरंतर, निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी एकाचवेळी कमाल दोन मतदारसंघात उभे राहण्याची आहे मर्यादा आहे. असं असतानाही व्यंकटेश्वर महास्वामीजी यांनी सोलापूर, अमरावती आणि नागपूरमध्येही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Venkateswara Mahaswami
Ambedkar On Modi: भीती दाखवण्यासाठी मोदींकडून ED, CBIचा गैरवापर; आंबेडकरांचा आरोप

गुन्हा दाखल करणार

तर व्यंकटेश्वर महास्वामी यांच्या कृत्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता स्वामींच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यंकटेश्वर महास्वामीजी हे कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील मूळ रहिवासी आहेत. 2019 साली सोलापूर लोकसभा निवडणुकीतही त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणुकीत त्यांचे डिपॉजिट जप्त झाले होते.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com